शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

खामगावात 20 जानेवारीला राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 14:08 IST

खामगाव : सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे.

खामगाव : सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा कादंबरीकार नवनाथ गोरे हे उपस्थित राहणार असून, साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध युवा अभिनेता,लेखक, वक्ते राजकुमार तांगडे (शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला फेम )यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला   विशेष पोलीस महानिरीक्षक (सुरक्षा ) मुंबई मा. श्री कृष्णप्रकाश व विशेष पोलीस उपमहानिरीक्षक मुंबई,  डॉ.बी जी शेखर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आ. अॅड. आकाश फुंडकर ( आमदार खामगाव ) व खामगावच्या नगराध्यक्षा  अनिताताई वैभव डवरे उपस्थित राहणार आहेत. या  उद्घाटन समारंभाला  बुलढाण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ पाटील  अकोला येथून  प्रा.डॉ.संतोष हुशे, प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे,  प्रा. गजानन भारसाकळे, सुप्रसिद्ध हास्यकवि *अॅड अनंत खेळकर,  ज्येष्ठ पत्रकार राजीव पिसे  प्रा वंदना दीपक मोरे  व प्रशांत सावलकर  यांची उपस्थिती राहणार आहे. खामगाव येथील पत्रकार भवनामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत स्वागताध्यक्ष कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष तेजेंद्रसिंह चौहान, तरूणाईचे अध्यक्ष नारायण पिठोरे, सृष्टी बहुउद्देशीय युवा संस्थेचे अध्यक्ष संतोष इंगळे, संयोजक अरविंद शिंगाडे  यांनी ही माहिती दिली.          उद्घाटन समारंभात  संमेलनाच्या निमित्ताने शब्दसृष्टी  या स्मरणिकेचे प्रकाशन  तसेच  अरविंद शिंगाडे लिखित  'सूत्रसंचालनाची सूत्रे' या  ई-बुकचे प्रकाशन  मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.  चंद्रशेखर जोशी  व  पूजा काळे  या सत्राचे  सूत्रसंचालन  करतील व  उमाकांत कांडेकर  आभार मानतील.      उद्घाटन समारंभा अगोदर ग्रंथदिंडीने या साहित्य संमेलनाचा शुभारंभ होणार असून, बुलडाण्याचे उपवनसंरक्षक मा.   संजय माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत  व नायब तहसीलदार योगेश देशमुख  यांचेसह  शहरातील  शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य - प्राध्यापक, विविध संस्थांचे पदाधिकारी  ,साहित्यिक, पत्रकार  व  विद्यार्थी तसेच  साहित्यप्रेमी नागरिकांची उपस्थिती राहील.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावliteratureसाहित्य