शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

बुलडाणा : डोंगरखंडाळा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद; ग्रामस्थांच्या दगडफेकीत एसडीओ, तहसिलदार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:50 IST

बुलडाणा : शहरानजीकच्या डोंगरखंडाळा येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेला शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली.

बुलडाणा : जिल्हा मुख्यालयापासून अग्नेय दिशेला १२ किमी अंतरावर असलेल्या डोंगरखंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्यत्र हलविण्याच्या कारणावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये वाद होऊन ग्रामस्थांनी दगडफेक केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. यामध्ये उपविभागीय अधिकारी सुहासीनी गोणेवाड, एसडीपीओ बी.बी. महामुनी आणि तहसिलदार सुरेश बगळे यांच्यासह २२ जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. पोलिसांनी २२ ग्रामस्थांना ताब्यात घेतले असून, शिवाजी महाराजांचा पुतळा ग्रामपंचायतच्या इमारतीत हलविण्यात आल्यानंतर आता तणाव निवळला असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दिलीप भूजबळ पाटील यांनी दिली.येथून जवळच असलेल्या डोंगरखंडाळा येथे ग्रामस्थांनी कोणतीही परवानगी न घेता छ. शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळी पोलिस बंदोबस्तात पुतळा हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलिस व बांधकाम विभागाच्या कर्मचाºयांवर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये उपविभागीय अधिकारी सुहासिनी गोणेकर, तहसीलदार सुरेश बगळे यांच्यासह पोलिस जखमी झाले. संतप्त ग्रामस्थांनी एक बसही पेटवून दिली. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. काही काळ या भागात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. आता गावातील परिस्थिती नियंत्रणात असून तणाव निवळला आहे. पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह अधिकारी डोंगरखंडाळा येथे तळ ठोकून आहेत. दरम्यान,गावात शांतता समितीची बैठक पार पडली असून गावकºयांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार हर्षवर्धन सपकाळ, बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी गावकºयांना शांततेचे आवाहन केले.

बस पेटविली, सरकारी वाहनांचे नुकसानसंतप्त ग्रामस्थांनी चिखलीकडे जाणाºया बसमधील प्रवाशांना उतरवून बस पेटवून दिली. तसेच महसुल व पोलिस प्रशासनाच्या एकून सहा वाहनांचीही तोडफोड केली. नजीकच्या वरवंड या गावात रास्ता रोको करणाºया ग्रामस्थांपैकी २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांना बुलडाणा येथे पाठविण्यात आले आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी