शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

टायर रिमोल्डींग क्षेत्रातही एसटी उतरणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 19:17 IST

खासगी वाहनांसह, मोठी वाहने, शासकीय वाहनांचेही टायर रिमोल्डींग महामंडळ करणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाचा फटका बसल्यामुळे गेल्या चार महिन्यात ६० कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने आता टायर रिमोल्डींग क्षेत्रातही पदार्पण केले असून अमरावती येथील प्लॅन्ट मधून वाहनांचे टायर रिमोल्डींग करून मिळणार आहे. कोरोनाचा फटका बसल्यामुळे एसटी महामंडळ नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोध असल्याचे स्पष्ट होत आहे. खुल्या पद्धतीने आता एसटी टायर रिमोल्डींग व्यवसाय आणि मालवाहतुकीच्या व्यवसायत उतरत आहे. त्यामुळे खासगी वाहनांसह, मोठी वाहने, शासकीय वाहनांचेही टायर रिमोल्डींग महामंडळ करणार आहे.गेल्या काही महिन्यापासून बंद असलेली एसटीची प्रवासी वाहतूक मधल्या काळात जिल्ह्यातंर्गत सुरू झाली होती. मात्र प्रवाशांची मर्यादा पाहता एसटी महामंडळाला यातून फारसे उत्पन्न मिळालेले नाही. दरम्यान, १९ आॅगस्ट रोजी सायंकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांशी संवाद साधून आंतरजिल्हास्तरावर वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाला आता काहीसा दिलासा मिळाला आहे.मात्र एकदम प्रवाशी वाहतूक पूर्ववत सुरू होणार नसली तरी सोमवारपासून त्यानुषंगाने प्रवाशी भारमान विचारात घेवून बुलडाणा विभागा त्यांच्या बसगाड्याचे शेड्यूल ठरविणार आहे. तुर्तास प्रवाशी मर्यादाही निश्चित करण्यात आल्याने निम्म्या प्रवाशांवरच ही वाहतूक होणार असल्याचे संकेत विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.त्यानुषंगाने आंतरजिल्हा प्रवाशी वाहतुकीबाबत काही नवीन शेड्यूल बुलडाणा विभागाने आखले असल्याचेही ते म्हणाले.प्रत्यक्षात काय प्रतिसाद मिळतो यावर पुढील भूमिका ठरविणार असल्याचे रायलवार यांनी सांगितले. त्यामुळे एसटी महामंडळाने कोरोना संकटाच्या काळात कात टाकून प्रवाशी वाहतुकीसोबतच नवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधण्याचे प्रयत्न चालवले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी