शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचे मालवाहतूक, गोदामाचे स्वप्न झाले धुसर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2020 15:28 IST

प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत

- ब्रम्हानंद जाधव  लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांकरीता मालवाहतूक आणि गोदामाची व्यवस्था करण्याची घोषणा माजी परिवहन मंत्र्यांनी केली होती. या घोषणेची ३ जानेवारीला वर्षपुर्ती होत असतानाही राज्यात विभाग नियंत्रक स्तरावर अंमलबजावणीच्या हालचाली झाल्या नाहीत. घोषणेचा महामंडळालाच विसर पडल्याने एसटीचे मालवाहतूक आणि गोदामाचे स्वप्न धुसर होत आहे.राज्य परिवहन महामंडळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने नवनवीन बसेस व विविध उपाययोजना करताना दिसून येत आहे. दरम्यान, एसटीचे उत्पन्न वाढविण्यासोबत शेतकऱ्यांना शेतमाल साठवण्यासाठी किफायतशीर दरात सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मालवाहतूक सेवा सुरू करण्याची घोषणा गतवर्षी करण्यात आली होती. तसेच महामंडळाकडून गोदामांचा व्यवसायही सुरू करण्यात येणार होता. महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षीत असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत माजी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घेतला होता. त्यासाठी स्वतंत्र वाहनांद्वारे मालवाहतूक करणे व विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्यात येणार होती. रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर एसटीचीही मालवाहतूक सुरु करण्याचे हे धोरण होते. वापरातील प्रवासी वाहनांचे नऊ वषार्नंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रुपांतरण करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची रीतसर मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने मालवाहतुकीसाठी वापरण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आलेले असतानाही त्याची अंमलबजावणी मात्र झालेली नाही. कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी आदी सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक या माध्यमातून केली जाणार होती. परंतू याबाबतच्या निर्णयाला वर्ष पुर्ण होत आलेले असतनाही त्याच्या अंमलबजावणी शुन्य आहे.विभागस्तरावर सुचनाच नाहीत!प्रवासी वाहतूकीबरोबर मालवाहतूक करणे व गोदामांच्या व्यवसायात उतरण्या संदर्भात विभागस्तरावर कुठल्याच सुचना आतापर्यंत प्राप्त झालेल्या नाहीत. याबाबत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सल्लागार कंपनीने त्यांचा अहवाल सादरीकरण केला होता. या निर्णयाला वर्ष होत आलेले आहे; परंतू याबाबतचे पत्र विभागास्तरावर महामंडळाकडून आलेले नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.

नव्या मंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्षमाजी परिवहन मंत्र्यांनी केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करायची की, त्यावर वेगळा निर्णय घ्यायचा हे नव्या परिवहन मंत्र्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एसटीच्या मालवाहतूक व गोदामाच्या घोषणेवर नवी मंत्री काय निर्णय घेतात याकडे एसटी महामंडळातील अधिकाºयांचेही लक्ष लागूण आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी