शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

रक्षाबंधनासाठी एसटीच्या जादा बसेस; भाऊ- बहिणींना सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 12:29 IST

खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले.

ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते.अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ९ आगारांकडूनही जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.२६ आॅगस्ट रोजी दैनंदिन किलोमीटरच्या दहा टक्के जादा नियोजन करण्यात आले आहे.

- अनिल गवई

खामगाव: बहिणींना ‘रक्षाबंधना’ची भेट म्हणून राज्य परिवहन मंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे.  बुलडाणा जिल्ह्यातील सातही आगारातून दैनंदिन किलोमीटरच्या दहाटक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. यामध्ये लांब पल्ल्याच्या वाहतुकीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते. त्याचप्रमाणे अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील ९ आगारांकडूनही जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आल्याचे समजते.

'रक्षाबंधन'निमित्त एसटी  महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी  आगार निहाय स्थानिक पातळीवर जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा, खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, मेहकर आणि चिखली या सातही आगारासोबतच देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, नांदुरा, मोताळा आणि लोणार या वाहतूक नियत्रंण केंद्रावरूनही जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये रविवारी दैनंदिन वाहतुकीच्या तुलनेत दहा टक्के जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. लांब पल्ल्यांच्या गाड्यांना यामध्ये प्राधान्य दिल्या जाणार असून त्या दृष्टीकोनातून प्रत्येक आगारातून अतिरिक्त वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.

परतीच्या प्रवासासाठीही सुविधा!

२५, २६ आणि २७ आॅगस्टरोजी एसटी महामंडळाकडून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये २६ आॅगस्ट रोजी दैनंदिन किलोमीटरच्या दहा टक्के जादा नियोजन करण्यात आले आहे. तर परतीच्या प्रवासासाठी २७ आॅगस्ट रोजी देखील भाऊ-बहिणींना अतिरिक्त सुविधा देण्याचा एसटी महामंडळाचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे दिसून येते.

 एसटी कर्मचाऱ्यांच्या रजा बंद!

रक्षाबंधनानिमित्त प्रवाशांना अतिरिक्त सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळातील चालक-वाहकांसोबतच कार्यालयीन कर्मचाºयांच्या रजा यापार्श्वभूमीवर बंद करण्यात आल्याची माहिती आहे. रक्षाबंधन सणाच्या कालावधीत   सर्व एसटी कर्मचारी रजा न घेता अहोरात्र काम करुन प्रवाशांना सुरक्षित व वक्तशिर सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे समजते.

टॅग्स :khamgaonखामगावstate transportराज्य परीवहन महामंडळRaksha Bandhanरक्षाबंधन