पिंपळगाव राजा (बुलढाणा): खामगाव-पिंपळगाव राजा मुख्य रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू झाले आहे. या कामामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडले असून याकडे प्रामुख्याने संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज अपघातांची मालिका सुरू असून तीन दिवसात तीन वाहने रस्त्याच्या खाली उलटली आहे. आज सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान खामगाव आगाराच्या राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस उलटली. यामध्ये चालक वाहक तसेच बसमधील प्रवाशांना किरकोळ इजा झाली. त्यामुळे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाच्या कामाच्या कार्यप्रणालीवर प्रवाशांनी तीव्र रोष व्यक्त केला असून संबंधित प्रशासनाने काम करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराला सूचना देण्याची मागणी केली आहे.
खामगाव-पिंपळगाव राजा-तरवाडी या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून एका कंत्राटदाराने सुरु केले आहे.यां रस्त्याच्या दोन्ही बाजूने मुरूम टाकून मधला जुना डांबरी रोड खोदुन पूर्ण रस्त्याची लेव्हल करणे सुरु आहे, मात्र संबंधित कंत्राटदाराने एक बाजू पूर्ण खोदून टाकणे गरजेचे होते मात्र दोन्ही बाजू खोदल्याने पूर्ण रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला असून सर्वत्र बारीक खडेगोटे आढळून येत असल्याने दुचाकी वाहन मोठ्या प्रमाणात स्लिप होत असून अपघात होत आहे. दि. 29 एप्रिल रोजी ओमणी कार रोडच्या कडेला उलटले, तर आज एक टँकर रोडच्या कडेला उलटले तर आज सायंकाळी राज्य परिवहन खामगाव आगाराची एसटी बस उलटली, त्यामुळे राज्य परिवहन बस चे नुकसान झाले असून प्रवाशांना किरकोळ इजा झाली आहे. यां रस्त्यावर काम सुरु असल्याने कर्तव्यावर असलेल्या सुपरवायझर यांच्याकडे अनेकांनी रस्त्याच्या कामाबाबत आपल्या तोंडी तक्रारी मांडल्या मात्र कुठल्याही वाहन धारकांचे तसेच प्रवाशांचे समाधान न करता सदर काम सुरु वेजबाबदार पणे सुरु आहे. त्यामुळे यां कामाबाबत प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून कंत्राट दारा विरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.