शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

लालपरी असुरक्षित; अग्निशमन यंत्र गायब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 11:54 IST

ST Bus News बसस्थानक व आगरामध्ये काही बसेसची पाहणी केली असता बसची बाहेरूनच नव्हे, तर आतूनही दुरवस्था झाल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: अलिकडे राज्यात एसटी बसेसना आग लागल्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभमीवर बुलडाणा येथील एसटी महामंडळाच्या बसस्थानक व आगरामध्ये काही बसेसची पाहणी केली असता बसची बाहेरूनच नव्हे, तर आतूनही दुरवस्था झाल्याचे दिसून आले. अनेक एसटी बसमधील अग्निशमन यंत्र गायब असल्याने लालपरी असुरक्षित असल्याचा प्रकार समोर येत आहे. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद घेऊन शहरापासून गावखेड्यापर्यंत धावणारी राज्य परिवहन महामंडळाची लालपरी खऱ्या अर्थाने लोकवाहिनी ठरली. मात्र, खिळखिळ्या झालेल्या बसेस, सोयी-सुविधांच्या अभावामुळे आता लालपरीतील प्रवास असुरक्षित ठरु लागला आहे. महामंडळाच्या बसेसमध्ये असलेली अग्निशमन यंत्रेही बेपत्ता झाली असून याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष असल्याने प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात असल्याचे चित्र बसस्थानामध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये पाहणी केल्यानंतर दिसून आले आहे. आता काही दिवसांनी उन्हाळा सुरु होणार असून उन्हाचा पारा वाढत जाऊन आगीच्या घटनेत वाढ होतात. जिल्ह्यातील सर्वाधिक नागरिक राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करतात. त्यामुळे बसेसमध्ये अग्निशमन यंत्राची सुविधा आहे की नाही, याबाबत बसेसची पाहणी केलीअसता अनेक बसेसमध्ये  अग्निशमन यंत्रच नसल्याचे दिसून आले आहे. अग्निशमन यंत्र बसविण्याकडे महामंडळाचेही दुर्लक्ष होत असल्याने प्रवासी लालपरीत आगीच्या धगेवर प्रवास करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अग्निशमन यंत्र बसविण्याची गरज आहे.

प्रथमोपचार पेट्या गायबलालपरीमध्ये प्रवास करीत असताना कुठे काही अपघात झाला तर प्रवाशांसह चालक-वाहकांवर प्रथमोपचार करण्यासाठी चालकाच्या कॅबिनमध्ये प्रथमोपचार पेट्या बसविण्यात आल्या होत्या. त्या पेट्याही एसटी बसमधून गायब झाल्या आहे.  त्यातील साहित्य बेपत्ता झाल्याचे दिसून आले. 

वायफाय सुविधा नावालाच अँड्रॉईड मोबाईलच्या युगात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मनोरंजन व्हावे, याकरिता प्रत्येक बसेसमध्ये वाय-फाय यंत्रणा बसविण्यात आली होती. याचा कंत्राट एका खासगी कंपनीकडे होता. परंतु, वर्षभरातच यंत्रणेचा बोजवारा उडाला. बसेसमधील ही सुविधा बंद झाली आहे. 

बसची आतून दुरवस्था बसस्थानकामध्ये उभ्या असलेल्या दोन एसटींची पाहणी केली असता आतून दुरवस्था झाल्याचे दिसून आले. यातील काही बसेसचे तर आसनच तुटलेले होते. काहींच्या खिडक्या तुटलेल्या अवस्थेत दिसून आल्या. एम. एच. ४०. एन. ८९४७ क्रमांकाच्या बसेसचे आसन तुटलेले व खाली पडलेले होते. एम. एच. ४०. ८८५२ क्रमांकाच्या बसेसचे आसन व खिडकी तुटलेली होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportएसटी