शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोठा अनर्थ टळला! राजूर घाटात एसटी बसला अपघात, चार जण किरकोळ जखमी

By निलेश जोशी | Updated: October 9, 2023 22:54 IST

घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाले

नीलेश जोशी, बुलढाणा: शहरा लगतच्या राजूर घाटात मलकापूरला जाणाऱ्या एसटीबस अपघात होऊन चार जण किरकोळ जखमी झाले. बस चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे माेठी दुर्घटना टळली. अन्यथा ही बस थेट दरीत कोसळली असती. हा अपघात रात्री साडेसात वाजेच्या सुमारास घडला.बुलढाणा आगारातून एमएच ४०-एन-८१७१ क्रमांकाची बस ही मलकापूरसाठी सायंकाळी निघाली होती.

दरम्यान साडेपाच किमीच्या राजूर घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. नेमक्या वळणवरच हा प्रकार घडला. थोडी जरी चूक झाली असती तर बस काही क्षणात दरीमध्ये कोसळली असती. परंतू चालकाने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेत पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या नालीत घुसवली. गाडीचा वेग पहाता ही गाडी डोंगराला धडकून नालीमध्येच अडकली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या अपघातामध्ये जिजाबाई सिद्धार्थ नरवाडे (रा. घुस्सर, ता. मोताळा) ही महिला जखमी झाली असून तिच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहे. त्यांची माहिती मिळू शकली नाही. एसटी महामंडळातर्फे जखमी जिजाबाई नरवाडे यांना ५०० रुपयांची तातडीची आर्थिक मदत करण्यात आली आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी गेलेल्या तपासणी पथकातील एकाच्या म्हणण्यानुसार वाहन चालकाची यात चुकू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातासंदर्भात प्रत्यक्षात तपासात काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :state transportएसटीbuldhanaबुलडाणा