शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

एसटी आगाराचे नियोजन कोलमडले; परीक्षेला जाणारे विद्यार्थी अडचणीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:53 IST

मेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्‍याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला आहे.

ठळक मुद्देटायरअभावी बस उभ्या!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: मेहकर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने ग्रामीण भागातून शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिक आपल्या विविध कामांसाठी मेहकर येथे येत असतात; मात्र गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसला टायर नसल्याने बस बंद आहेत. अधिकार्‍याच्या नियोजनाअभावी परीक्षेच्या पूर्वसंध्येला मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला आहे.मेहकर तालुक्याला जवळपास १४0 खेडे विभाग जोडलेला आहे; मात्र अधिकार्‍यांचे कोणतेही नियोजन नसल्याने अनेक गावच्या एसटीच्या  फेर्‍या बंद पडल्या आहे. एसटी बसला टायर नसल्याने १६ एसटी बसेस बंद आहेत, तर अनेक गाड्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे हय़ा गाड्यासुद्धा आगारामध्ये उभ्या आहेत. २१  फेब्रुवारीपासून विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा सुरू होत आहे. अशा वेळी ग्रामीण भागात जाणार्‍या एसटीच्या फेर्‍या बंद असल्याने याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर होण्याची शक्यता आहे. एसटी बसेसची अवस्था खराब असल्याने मोठय़ा शहराला धावणार्‍या फेर्‍यासुद्धा बंद पडल्या आहेत. स्थानिक अभिकार्‍यासह वरिष्ठ अधिकार्‍यांचे मेहकर आगाराकडे सतत दुर्लक्ष होत असल्याने आगाराचे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान होत आहे. अनेक गावच्या एसटी बसेस वेळेवर सुटत नाही त्यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांना बस स्थानकावर ताटकळत बसावे लागते. तरी वरिष्ठ अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रासपच्या वतीने आंदोलनाचा इशारा मेहकर आगाराचा कारभार ढेपाळला असून, एसटी बसेसला टायर नसल्याने अनेक गाड्या बंद अवस्थेत आहेत. काही गाड्यांची दयनीय अवस्था झाल्यामुळे अनेक गावांच्या फेर्‍या रद्द होत आहेत. विद्यार्थी गोर गरीब नागरिक यांचे हाल होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सुविधा द्यावी अन्यथा रासपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रासपचे जिल्हा उपाध्यक्ष गजानन गारोळे, तालुका अध्यक्ष गजानन बोरकर, शहर अध्यक्ष अविनाश लाड, ओकार खांडेकर, शिद्धेश्‍वर राऊत, गजानन भुतेकर, दिनेश सावंत, शिवाजी औदगे, शिवाजी ढवळे, शे. सदाम शे. रहेमान शे. कुरेशी यांनी दिला आहे.

टायरची मागणी वरिष्ठाकडे केलेली आहे. टायर आल्यानंतर गाड्या सुरळीत सुरू होतील.- रणवीर कोळपेकार्यशाळा अधीक्षक, मेहकर आगार 

टॅग्स :buldhanaबुलडाणाstate transportराज्य परीवहन महामंडळ