शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

SSC Result 2019: बुलडाण्यात मुलीच अव्वल; जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 16:23 IST

बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे.

ठळक मुद्दे मुलींचा निकाल ८२.१२ टक्के, तर मुलांचा निकाल ७२.९६ टक्के लागला आहे. एकूण ३०८८३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.

बुलडाणा : मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्य उच्च माध्यमिक इयत्ता  दहावीचा आॅनलाईन निकाल शनिवार, ८ जून रोजी जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यंदादेखील मुलींनीच बाजी मारली आहे. बुलडाणा जिल्ह्याचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून, बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ८२.१२ टक्के, तर मुलांचा निकाल ७२.९६ टक्के लागला आहे. जिल्ह्यात एकूण ४० हजार ७०७ नोंदणीकृत परीक्षार्थी विद्यार्थी होते. त्यापैकी ४० हजार ७२ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. त्यापैकी ७८६९ विद्यार्थी विशेष गुणवत्ता श्रेणीत, १३१४३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ८४११ द्वितीय श्रेणीत, तर १४६० विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत असे एकूण ३०८८३ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक ९०.१५ टक्के निकाल सिंदखेड राजा तालुक्याचा, तर सर्वात कमी निकाल जळगाव जामोद तालुक्याचा ६८.२९ टक्के लागला आहे. उर्वरित तालुक्यांमध्ये बुलडाणा-८३.६५ टक्के, मोताळा, ७४.७५ टक्के, देऊळगाव राजा ८४.०९ टक्के, लोणार ७२.६५ टक्के, मेहकर ८१.१६ टक्के, शेगाव ७२.१७ टक्के, नांदुरा ६७.८३ टक्के, मलकापूर ७५.९४ टक्के, संग्रामपूर ६९.७९ टक्के निकाल लागला आहे.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालbuldhanaबुलडाणा