शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

अडीच लाख हेक्टरवर दुबार पेरणी

By admin | Updated: August 11, 2015 00:08 IST

पावसाचा लहरीपणा ; पेरणी क्षेत्रापैकी मोड व नापेर क्षेत्रही वाढले.

बुलडाणा : जून महिन्यानंतर पावसाने दीड महिना दडी मारली तरी जिल्ह्यात ८९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या; मात्र तब्बल दोन महिने पाऊस नसल्यामुळे बरेच क्षेत्र नापेर राहिले, तर काही शेतकर्‍यांनी पेरणी क्षेत्रात मोड म्हणजेच पेरलेले शेत वखरून टाकले. त्यामुळे जिल्ह्यात जवळपास २ लाख ५२ हजार हेक्टरवर दुबार पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. कृषी विभागाने यंदा ७ लाख ४८ हजार हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन केले. त्यापैकी ७ ऑगस्टपर्यत ६ लाख ६३ हजार म्हणजे ८९ टक्के पेरणी पूर्ण केली; मात्र मे महिन्याचा शेवटचा आठवडा सोडला, तर पुढे जून व जुलै पावसाने कायमस्वरूपी दडी मारली. पावसाआभावी काही ठिकाणी बियाणे उगवलीच नाही, तर बर्‍याच ठिकाणी लहान पिके कोमेजून सुकून गेल्यामुळे हताश झालेल्या शेतकर्‍यांनी आपल्या शेतात नांगर फिरवून पिके वखरून काढली. काही गावांतील निराश झालेल्या काही शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील उभ्या पिकावर जनावरे चरण्यास सोडली. यामुळे एकूण पेरणी क्षेत्रापैकी पिकांची मोड होणारे संभाव्य क्षेत्र १ लाख ९३ हजार ४१६ हेक्टर निर्माण झाले आहे. त्यामुळे या मोड होणार्‍या पिक पेरणी क्षेत्रापैकी दुबार पेरणीचे संकट १ लाख ७१ हजार ४५९ हेक्टरवर निर्माण होणाची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. याशिवाय ऑगस्ट महिन्यात पहिल्याच आठवड्यात पावसाने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सरसरीपेक्षा जास्त पाऊस झाला. बर्‍याच ठिकाणी पूर आणि अतवृष्टीमुळे उभ्या पिकांचे नुकसान झाले. आधी पावसाने मारलेली दडी व नंतर अतवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यानंतर आता शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून, कृषी विभागाकडून जिल्ह्यातील संभाव्य दुबार पेरणी होणारे क्षेत्र २ लाख ५२ हजार ८४७ हेक्टर एवढे वर्तविण्यात आले आहे.