शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोनाजी महाराजांच्या यात्रेस भक्तीभावात प्रारंभ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 14:36 IST

संपूर्ण विदर्भात प्रसिध्द संत सोनाजी महाराज यात्रात्सोवाला मोठ्या भक्ती भाव व हर्षोल्हासात सुरवात प्रारंभ झाला आहे.

- अझहर अली बुलडाणा - संपूर्ण विदर्भात प्रसिध्द संत सोनाजी महाराज यात्रात्सोवाला मोठ्या भक्ती भाव व हर्षोल्हासात सुरवात प्रारंभ झाला आहे. बुधवारी रात्री १२ वाजता महाराजांच्या रथयात्रेला सुरवात झाली. रथ आकर्षरित्या फुलाने सजविण्यात आला होता. यावेळी हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित झाले.     श्री संत सोनाजी महाराज यांच्या मंदीरापासुन रात्री बारा वाजता दरम्यान सुरू झालेल्या रथ यात्रा अर्ध्या गावाची गावप्रदीक्षेणा करीत रात्री २ वाजताच्या दरम्यान प्रदीप वडोदे यांच्या घरा जवळ रथ थांबला. गुरूवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता वडोदे यांच्या घराजवळुन फुलांनी सजविलेल्या रथाची गाव प्रदीक्षणेला सुरवात केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता महाराजांच्या मंदीरासमोर रथ पोहोचल्यावर साडेबारा वाजता दाहीहांडी उत्सव साजरा झाला. सोनाजी महाराजांच्या दर्शनासाठी विदर्भासह मध्यप्रदेशातील हजारो भाविक संत नगरी सोनाळा येथे जमले आहे. या यात्रेला सर्व धमार्तील भाविक सहभागी होत असल्याने हि यात्रा राष्ट्रीय एकात्मतेची प्रतिक म्हणून ओळखली जाते.दरवर्षी सोनाजी महाराजांवर भाविकांची श्रध्दा बळकट होत असल्याने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्यप्रदेशातील भाविक मोठ्यासंख्येने येत आहेत. या वषीर्ही महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांचे अलोट जनसागर दिसुन आला. सोनाळा येथे चिखली तालुक्यातील उत्रदा पेठ,नांदुरा तालुक्यातील निरपूर, संग्रामपुर तालुक्यातील काटेल कोलद, वडगाव वाण टूनकी, बावनबीर, टूनकी खुर्द, आदिवासी ग्राम पिंगळी येथील पालख्या पोहचल्या आहेत. यात्रेत विविध मनोरंजनाचे खेळ, विविध साहीत्यांचे दुकाणे, खेळणे, पाळणे, चित्रपट गुहे, यासह खाद्य पदाथार्चे दुकाणे देखिल सजली आहेत. 

अंबाडीची चटणी, उडदाची भाजी व भाकरीचा महाप्रसाद!यात्रेदरम्यान भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येत आहे. अंबाडीची चटणी, उडदाची भाजी व भाकरी हा खास मेनू महाप्रसादाचा असतो.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSangrampurसंग्रामपूर