मद्यपी वडिलांचा मुलाने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 09:00 PM2020-09-18T21:00:40+5:302020-09-18T21:00:49+5:30

मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव रामजी मारोती मारकड (५५, रा. पहूर) असे आहे.

Son kills alcoholic father | मद्यपी वडिलांचा मुलाने केला खून

मद्यपी वडिलांचा मुलाने केला खून

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: मद्यासाठी सातत्याने पत्नीस पैसे मागणाऱ्या व न दिल्यास तिला त्रास देणाºया वडिलांचा लोणार तालुक्यातील पहूर येथील मुलाने गळा आवळून खून केल्याची घटना १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे नाव रामजी मारोती मारकड (५५, रा. पहूर) असे आहे. दरम्यान, त्यांचा खून केल्या प्रकरणी त्यांचा मुलगा विठ्ठल रामजी मारकड (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.
पहूर येथील रामजी मारोती मरकड हे दारू पिण्यासाठी सातत्याने त्यांच्या पत्नीकडे तगादा लावत होते. प्रसंगी त्रासही द्यायचे. सततच्या या प्रकाराला रामजी मारकड यांचा मुलगा विठ्ठल हा ही कंटाळला होता. दरम्यान, १७ सप्ेटंबर रोजी रामजी मारकड यांनी पत्नी द्वारकाबाईस मारहाण करून दारू पिण्यासाठी तिच्या गळ््यातील गहू पोत तोडून घेतली. याची माहिती त्यांचा मुलगा विठ्ठल यास मिळाली. आईच्या गळ््यातील गहू पोत वडिलांनी तोडून घेतल्याचा त्यास राग आला. त्यामुळे त्याने वडिलांना मारहाण केली. रागाच्या भरात त्याने वडिल रामजी मारकड यांचा गळाही आवळला. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. १७ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. प्रकरणी गंगासागर कुंडलीक जुमडे (३०, रा. जांभरूण, ता. जि. हिंगोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लोणार पोलिसांनी आरोपी विठ्ठल मारकड विरोधात खुनाचा गुन दाखल केला. सोबतच त्यास १८ सप्टेंबर रोजी अटक केली. त्यास १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अझर शेख, पोलिस कर्मचारी विशाल धोंडगे, कैलास चतरकर, गजानन बनसोड, शेखर थोरात, चंद्रशेखर मुरडकर, रविंद्र बोरे, गजानन ठाकरे हे करीत आहेत.

 

 

Web Title: Son kills alcoholic father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.