शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी भंडारेंवर ४.५ कोटींची शेती हडपल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:01 IST

सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांचे ओएसडी : कुटुंबीयांचा गंभीर आरोप, चौकशीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलढाणा : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचे ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्यावर तब्बल ४.५ कोटी रुपये किमतीच्या १४ एकर शेतीच्या बेकायदेशीर हस्तांतरणाचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. डोंगरखंडाळा येथील शेतकरी राहुल तारे यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करत संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली.

राहुल तारे यांच्या नावावर डोंगरखंडाळा शिवारात एकूण २८ एकर वडिलोपार्जित शेती असून, ती २३ वारसदारांमध्ये सामायिक आहे. मात्र, त्यापैकी केवळ आठ वारसदारांनी गुप्तपणे १४ एकर जमीन सुमारे साडेचार कोटी रुपयांना विकल्याचे समोर आले आहे. ही जमीन छत्रपती संभाजीनगर येथील महेंद्र राऊत यांनी खरेदी केल्याचे सांगितले जात असून, ते ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांचे मावसभाऊ असल्याचा दावा करण्यात आला आहे. सदर व्यवहार १५ जानेवारी २०२५ रोजी झाला. या व्यवहारात दुय्यम निबंधक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याचा आरोप तारे यांनी केला आहे. तसेच, उर्वरित वारसदारांची कोणतीही संमती न घेता जमीन विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, दुय्यम निबंधक सागर पवार यांनी प्रकरणाची माहिती असूनही व्यवहार नोंदवला, असेही त्यांनी म्हटले. तारे कुटुंबीयांचा आरोप आहे की, या प्रकरणात स्थानिक प्रशासनानेही संशयास्पद भूमिका घेतली. तत्कालीन मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांनी हरकती प्रलंबित असतानाही जमीन राऊत यांच्या नावावर नोंदवली, असा आरोपही त्यांनी केला.

भंडारेंच्या दबावाखाली व्यवहार पार पडला

तारे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण व्यवहार ओएसडी सिद्धार्थ भंडारे यांच्या दबावाखालीच पार पडला. त्यामुळे भंडारे यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (सीडीआर) तपासून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.तारे कुटुंबीयांनी मंत्री संजय शिरसाट यांना भेट देऊन निवेदन सादर करताना भंडारे यांना तत्काळ पदमुक्त करण्याची आणि निष्पक्ष चौकशीचे आदेश देण्याची मागणी केली.

"तारे कुटुंबीयांनी आरोप केलेल्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही."- सिद्धार्थ भंडारे, ओएसडी, मंत्री संजय शिरसाट

English
हिंदी सारांश
Web Title : Minister's Aide Accused of Land Grab: High-Level Inquiry Demanded

Web Summary : Minister Shirsaat's aide, Bhandare, faces land grabbing accusations involving a ₹4.5 crore land deal. Farmer Rahul Tare alleges illegal land transfer with forged consents. He demands a high-level inquiry into the matter, accusing Bhandare of influence and officials of collusion. Bhandare denies involvement.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटbuldhanaबुलडाणाGovernmentसरकारCrime Newsगुन्हेगारी