शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
5
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
6
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
7
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
8
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
9
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
10
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
11
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
12
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
13
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
14
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
15
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
16
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
17
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
18
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
19
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे भिजत घोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 11:40 AM

Jalgaon-Barhanpur road : सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे.

- नानासाहेब कांडलकर   लोकमत न्यूज नेटवर्क   जळगाव जामोद : आडवळणावर असलेल्या जळगाव शहराला व तालुक्याला आंतरराज्य महामार्गावर आणण्यासाठी जळगाव-बऱ्हाणपूर रस्त्याचे सातपुडा पर्वतातील काम पूर्ण होणे आणि नांदुरा-जळगाव मार्गावरील मध्य रेल्वेच्या क्रॉसिंगवर उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे हे प्रश्न अद्यापही पूर्णत्वाला गेले नाहीत. त्यामुळे आडवळणाच्या जळगाव नगराचे भाग्य केव्हा उजळणार, असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील काही रस्त्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. परंतु काही वर्षांपूर्वी नांदुरा रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलासह नांदुरा नगरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाचे भूमिपूजन नितीन गडकरी यांनी केले होते. परंतु नंतर तो प्रश्न प्रलंबितच राहिला. जळगावकडे येतांना रेल्वे गेटची मोठी अडचण वाहनधारकांना सहन करावी लागते. चोवीस तासांपैकी किमान १६ ते १७ तास हे रेल्वे गेट बंद असते, अशा प्रवाशांचा अनुभव आहे. त्यामुळे या रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे. हे काम नितीन गडकरी यांनी लक्ष दिले तरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. जळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य महामार्गाचा प्रश्नसुद्धा स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत प्रलंबित आहेत. जळगाव-बऱ्हाणपूर हे अंतर ५९ किलोमीटरचे आहे. पैकी ते ४३ किलोमीटर रस्त्याचा भाग हा मध्यप्रदेश हद्दीत येतो. मध्यप्रदेश सरकारने ४३ किलोमीटरच्या रस्त्याचे दुपदरीकरण करून डांबरीकरण केले आहे. सातपुडा पर्वतात येणाऱ्या मार्गाचेही दुपदरीकरण केले आहे. त्यामुळे आता या रस्त्यावर नियमित वाहतूक होण्यासाठी सातपुडा पर्वतातील सुमारे सहा किलोमीटर अंतराची अडचण आहे. जळगाव ते बऱ्हाणपूर या ५९ किलोमीटरपैकी सद्यस्थितीतील ५३ किमीच्या रस्त्याचे काम झाले आहे.  अवघ्या सहा किमीच्या अपूर्ण रस्त्यामुळे या मार्गावरील अधिकृत वाहतूक सुरू झाली नाही. बांधकाम विभागाने हा प्रश्न त्वरित सोडविण्याची गरज आहे. 

 ४० किमीचे अंतर होणार कमीजळगाव-बऱ्हाणपूर आंतरराज्य मार्ग सुरू झाल्यास बऱ्हाणपूर, खंडवा, इंदोर, उज्जैनकडे जाण्याचे अंतर सुमारे ४० किमीने कमी होणार आहे. सध्या नागपूर, अमरावती, अकोला, अकोट, शेगाववरून वाहने मलकापूर, मुक्ताईनगर मार्गे बऱ्हाणपूरला जातात. त्यामुळे सध्या आडवळणावर असणारे जळगाव शहर आंतरराज्य महामार्गावर येणार आहे. 

शेगावचे अंतर होणार कमी मध्यप्रदेशात श्री संत गजानन महाराजांचा मोठा भाविक वर्ग आहे. खंडव्यावरून बऱ्हाणपूर, जळगाव, जामोद मार्गे अनेक भक्त शेगावची पायीवारीसुद्धा करतात. हा रस्ता सुरू झाल्यास गजानन भक्तांची कमी अंतराने शेगाव येथे येण्याची सोय होईल. त्यामुळे हा रस्ता त्वरित सुरू होणे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदroad transportरस्ते वाहतूकNitin Gadkariनितीन गडकरीbuldhanaबुलडाणा