शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा परिषदेचे विद्यार्थी गिरवीणार ‘स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन’ ने धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 18:31 IST

बुलडाणा जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीचे धडे गिरविणार आहे.

ठळक मुद्देसिंदखेड सरपंचाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कधामणणगांव बढे (बुलडाणा): जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सर्वांगीण विकासासाठी स्वखर्चाने विविध उपक्रम राबविणाºया सिंदखेडच्या सरपंच विमा कदम यांनी स्मार्ट लर्निंग डिजीटल पेन बुक संच उपलब्ध करुन दिला. त्याद्वारे वर्ग एक व दोनचे विद्यार्थी बेसिक इंग्रजीचे धडे गिरविणार आहे. २० डिजीटल बुक तथा त्यासोबत डिजिटल पेन असा किटचा संच असून वापरण्यास अत्यंत सोपा व नाविण्यपूर्ण संच असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.डिजीटल पुस्तकातील अक्षरावर डिजिटल पेज ठेवल्यानंतर त्या अक्षराचा उच्चार निघतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाविण्य पूर्ण शिक्षणामुळे आवड निर्माण होते. १७ डिसेंबर रोजी सरपंच विमल कदम यांनी हा डिजिटल पेन बुक संच सिंदखेड येथील जिल्हा परिषद शाळेला भेट दिला. यापूर्वी शाळेसाठी ई लर्निंग संच सामाजिक आशय लिहिलेल्या स्कुल बॅग सरपंच कदम यांनी दिल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी मैदान, बगीचा असे उपक्रम राबवून शाळा स्वच्छ व सुंदर केली आहे. तर डिजिटल किटच्या सहाय्याने इंग्रजी, हिंदी, मराठी, गणित विषयाचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच विद्यार्थी आवडीने स्वयंअध्यन करु शकतात. खेळत खेळत शिक्षण यातून साध्य होईल अशी माहिती शिक्षक सचिन शेट्टी यांनी दिली. तर  सरपंच व गावकºयांच्या प्रयत्नातून ही शाळा आय.एस.ओ.नामांकन प्राप्त आहे.

ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सर्व संधी उपलब्ध व्हाव्यात हा या मागचा उद्देश आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल स्मार्ट पेन बुकच्या माध्यमातून कठीण विषय सोपे वाटतिल व त्यांना शाळेची ओढ निर्माण होईल.- विमल कदम, सरपंच सिंदखेड ता.मोताळा

टॅग्स :buldhanaबुलडाणाeducationशैक्षणिक