शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

लहानशा यंत्राची कमाल... सोयाबीन पेरणी करतयं धमाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 12:04 IST

Agriculture Sector : खर्चाची बचत होऊन पेरणीसुद्धा योग्य पद्धतीने होत असल्याने सदर नवनिर्मिती पेरणी यंत्र शेतकऱ्यांकरिता वरदान ठरू पाहत आहे.

- मनोज पाटीललोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : सद्यस्थितीत सर्वत्र शेतशिवारात खरिपाच्या पेरणीची लगबग सुरू आहे. दरम्यान बाजारात एक नवनिर्मित मानवचलीत लहानसे पेरणी यंत्र उपलब्ध झाले असून सदर यंत्रांची हाताळणी अत्यंत सुलभ व सोयीची आहे. त्यामुळे वेळेची व पेरणी खर्चाची बचत होऊन पेरणीसुद्धा योग्य पद्धतीने होत असल्याने सदर नवनिर्मिती पेरणी यंत्र शेतकऱ्यांकरिता वरदान ठरू पाहत आहे. महत्त्वाचे म्हणजे हे पेरणी यंत्र मोताळा तालुक्यातील मौजे दाभाडी या छोट्याशा गावात एका तरुण शेतकऱ्याकडे उपलब्ध आहे.मानवचलित पेरणी यंत्र ऍक्रेलिक फायबर पासून निर्मिती करण्यात आले असून यंत्र हाताळणी करिता लोखंडी हँडल देण्यात आले आहे. तसं पाहता यंत्र नाजूक दिसत असलं तरी त्याने आपला टणकपणा चांगलाच जपला आहे. या यंत्राला कसलाही दुरुस्ती खर्च सुद्धा लागत नाही. त्यामुळे यंत्राचा वापर करणे प्रत्येकाला परवडणारे आहे. या यंत्राद्वारे शेतात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील प्रत्येक पिकाची पेरणी होऊ शकते. जवळपास एका तासामध्ये दोन ओळींतील अंतर चार फूट असल्यास एक एकर क्षेत्र एका तासामध्ये पूर्ण होते. दोन ओळीमधील अंतर दोन फूट असल्यास दोन तासांमध्ये एका मजूराकडून पेरणी पूर्ण होते. या यंत्राने आपण १-२-३-४-५-६ अशा पद्धतीने आपल्याला अपेक्षित असे बी टाकू शकतो. तसेच दोन बियाणं मधील अंतर सहा इंचापासून दोन फुटापर्यंत आपण ठेवू शकतो. विविध पिके लागवड करताना एकरी अंदाजानुसार जे मनुष्यबळ लागतं ते पाहता या यंत्राद्वारे केवळ एकच व्यक्ती त्या मनुष्य बळाप्रमाणे पेरणी करू शकतो त्यामुळे मजुरीचा अवाढव्य खर्च आपसूकच कमी होतो. उदाहरणार्थ एका माणसाकडून दिवसभरामध्ये तीस मजुरांचे काम या यंत्राद्वारे सहज रित्या करता येते. पेरणी दरम्यान ज्या पद्धतीने ज्या अंतराने बियाण्यांची लागवड करायची आहे त्या अंतराची ऍडजेस्टमेंट सुद्धा या यंत्रात होते. त्यामुळे पेरणीकरिता लागणाऱ्या मजुरांची गरज सुद्धा भासत नाही. 

 

पेरणीवर होणारा खर्च व वेळ पाहता तो वाचावा, पेरणी सुलभ व्हावी या अनुषंगाने मी तामिळनाडूतून मानव चलित पेरणी यंत्र आणून आधी ते स्वतः वापरले. त्याचा फायदा पाहता हा फायदा इतर शेतकरी बांधवांना व्हावा या भावनेतून मी सदर यंत्र मागणीनुसार नफा ना तोटा या तत्त्वावर शेतकऱ्यांना आणून देत आहे.- योगेश पांडुरंग पाटीलशेतकरी रा. दाभाडी. ता. मोताळा

मागील वर्षी रब्बी हंगामात मी माझ्या शेतात सोयाबीन, भुईमूग व उडीद या पिकाची पेरणी या यंत्राद्वारे केवळ दोन मजुरांकरवी करून घेतली.  या यंत्रामुळे मजुरीचा खर्च  वाचला आहे.  शेतकऱ्यांनी जर हे मानवचलित यंत्र शेतात पेरणी करिता वापरले तर मजुरी करिता शेतकऱ्यांची होणारी भटकंती थांबली. -अरविंद  पाटीलशेतकरी रा. दाभाडी, ता. मोताळा

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरीMalkapurमलकापूर