शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा रोडवरील लूटमारप्रकरणी आरोपीचे स्केच जारी, तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून तयार केले स्केच

By अनिल गवई | Updated: July 26, 2023 17:45 IST

स्थानिक चित्रकला महाविद्यालयातील एका शिक्षकाने तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून स्केच तयार केले.

खामगाव : दुचाकीवर बसण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका शेतकऱ्याच्या हातून पावणेपाच लाखांची रक्कम हिसकावून पळणाऱ्या एका आरोपीचे स्केच शहर पोलिसांनी जारी केले आहे. स्थानिक चित्रकला महाविद्यालयातील एका शिक्षकाने तक्रारकर्त्यांच्या वर्णनावरून स्केच तयार केले.

खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथील दिलीप सदाशिव हटकर (वय ५५) या वृद्ध शेतकऱ्याने स्वत:सह दोन मुलांच्या खात्यातून पीक कर्जाची चार लक्ष ७३ हजार रुपयांची रक्कम काढली.खामगाव शहरातील एका राष्ट्रीयीकृत बँकेतून रक्कम काढल्यानंतर तीन हजार रुपये स्वत:कडे ठेवले. उर्वरित चार लक्ष ७० हजार रुपये थैलीत ठेवून मुलासह ते बँकेच्या बाहेर पडले. मुलाच्या गाडीवर बसण्याच्या प्रयत्नात असतानाच, दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हाताला हिसका देत रक्कम पळवली. या प्रकरणी हटकर यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, चौकशीचा भाग म्हणून शहर पोलिसांनी मंगळवारी तक्रारकर्ते हटकर यांना पाचारण केले. त्यांनी केलेल्या वर्णनावरून एका आरोपीचे स्केच जारी करण्यात आले.

तीन स्केच केली तयारखामगाव येथील एका चित्रकला महाविद्यालयातील चित्रकला शिक्षकाने तक्रारकर्ते दिलीप हटकर यांनी केलेल्या वर्णनावरून पैसे हिसकावणाऱ्या आरोपीची तीन स्केच तयार केली. या तीनपैकी एक स्केच आरोपीच्या चेहऱ्याशी मिळतेजुळते असल्याची तक्रारकर्त्यांची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी शेवटचे अर्थातच तिसरे स्केच जारी केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस