शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

‘वंचित’चे बुलडाणा जिल्ह्यातील सहा उमेदवार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 15:29 IST

प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या जागी राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांचे नाव यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी आणि युतीला चांगली टक्कर देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीर केलेल्या दुसºया यादीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघापैकी सहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या जागी राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांचे नाव यादीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने उमेदवाराची आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरला दुसरी यादी जाहीर केली आहे. दरम्यान, एक आॅक्टोबर रोजी त्यांची तिसरी यादी जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत.बुलडाणा जिल्ह्यात मलकापूरमध्ये वंचित बहुजन आघाडीने डॉ. नितीन नांदुरकर यांच्या रुपाने उमेदवार दिला आहे. बुलडाण्यामध्ये मोताळा येथील डॉ. तेजल शरद काळे यांची वर्णी लागली असून चिखली मध्ये अशोक सुरडकर यांना संधी देण्यात आली आहे. मोताळा नगर पंचायतमध्ये त्या नगरसेविका आहे. २०१२ मध्ये डॉ. तेजल काळे यांनी भाजप-सेना-रिपाइंचे उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. २०१५ मध्ये मनसेकडून त्यांनी नगर पंचायतीची निवडणूक लढवत प्रभाग चार मधून त्या विजयी झाल्या होता.सिंदखेड राजामध्ये सविता मुंडे या वंचितच्या उमेदवार राहणार असल्याचे पूर्वी पासूनच संकेत होते. त्यावर दुसºया यादीत त्यांचे नाव आल्याने एक प्रकारे शिक्का मोर्तबच झाले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या असलेल्या सविता मुंडे यांनी यापूर्वी काही आक्रमक आंदोलनेही केली होती. गेल्यावर्षी सिंदखेड राजामध्ये काँग्रेसच्या तिकीटावर लढलेले प्रदीप नागरे यांच्या त्या भगिन होत. त्यांचे वडीलही जिल्हा परिषद सदस्य होते.दरम्यान, खामगावमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शरद वसतकार यांची वर्णी लागली आहे. त्यांना उमेदवारी दिल्याने खामगाव मतदारसंघात नेमके काय उलटफेर होतात याकडे सध्या लक्ष लागून आहे.खामगावमधून वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र येथे शरद वसतकार यांचे नाव समोर करण्यात आले आहे. जळगाव जामोद मध्येही भारीपचे जुने कार्यकर्ते शरद शिवाजी बनकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे.धक्कातंत्र वापरण्यात प्रकाश आंबेडकर हे तरबेज आहे. त्याच प्रमाणे त्यांनी वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर करतानाही त्याचा वापर केला आहे. त्यामुळे त्याची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात आहे.चर्चेतील नावांना बगलवंचित बहूजन आघाडीकडून बुलडाण्यामध्ये जितेंद्र जैन, मोहम्मद सज्जाद तथा विष्णू उबाळे यांच्या नावाची सातत्याने चर्चा होती. मात्र या तिघांना डावलून येथे डॉ. तेजल शरद काळे यांना उमेदवारी दिल्या गेली आहे. त्यामुळे हा विषयही चर्चेचा ठरत आहे.

सोनोनेंऐवजी वसतकार खामगाव विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये तिसºया क्रमांकाची ४७ हजार ५४१ मते घेणारे भारिपचे अशोक सोनोने यांच्या ऐवजी येथे शरद वसतकार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या विधानसभा निवणुकीत अशोक सोनोने यांच्यामुळे उलटफेर झाला होता. यंदा मात्र त्यांच्या ऐवजी शरद वसतकरा यांचे नाव पुढे करण्यात येण्यामागे कोणते धक्कातंत्र आहे याची चर्चा खामगावामध्ये सध्या सुरू आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी