सिंदखेडराजा नाफेड यार्डात तुरीचे पंचनामे

By Admin | Updated: April 28, 2017 11:40 IST2017-04-28T11:40:50+5:302017-04-28T11:40:50+5:30

सिंदखेडराजा बाजार समिती यार्डात पडून असलेल्या तुरीचे पंचनामे तहसिलदार संतोष कनसे यांनी रखरखत्या उन्हात केले.

Sindkhedraja Nafeed Yarda's Puchi Panchnema | सिंदखेडराजा नाफेड यार्डात तुरीचे पंचनामे

सिंदखेडराजा नाफेड यार्डात तुरीचे पंचनामे

बिबी : सिंदखेडराजा बाजार समिती यार्डात २२ एप्रिलपर्यंत केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांच्या रांगेत पडून असलेल्या ६ हजार ८६९ तुरीचे पंचनामे तहसिलदार संतोष कनसे यांनी रखरखत्या उन्हात केले. यावेळी ५ हजार ६३८ क्विंटल तूरीचे  प्रत्यक्ष पंचनामे करतेवेळी शेतकरी हजर होते. तसेच १२३१ क्विंटल तुर असलेले शेतकरी गैरहजर होते. त्यांचीही नोंद तहसिलदार यांनी पंचनामे करतेवेळी घेऊन ठेवली आहे. तसेच आलेल्या आदेशानुसार तूर खरेदी सुरु होईल, असेही तहसिलदार कनसे यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी बाजार समितीचे सचिव ओंकार महाजन, सहाय्यक निबंधक महेंद्र बनसोडे, व्यवस्थापक डि.यु.हिवाळे, केंद्रप्रमुख बाहेकर व इतर बाजार समिती कर्मचारी व शेतकरी हजर होते.

Web Title: Sindkhedraja Nafeed Yarda's Puchi Panchnema