शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा : चारित्र्याच्या संशयावरून शिक्षकाने केला पत्नीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 03:00 IST

सिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ठळक मुद्देवर्षभरापासून विभक्त राहत होतेघटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: येथील एका शिक्षकाने चारित्र्याच्या संशयावरून वर्षभरापासून विभक्त राहत असलेल्या शिक्षक पत्नीचा धारदार चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना १0 डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी मृतक शिक्षिकेच्या भावाने सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.सुलभा सरोदे असे मृतक महिलेचे नाव आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील रहिवासी सुलभा हिचे लग्न सिंदखेड राजा येथील प्रफुल्ल प्रभाकर सरोदे याच्यासोबत १३ वर्षांपूर्वी झाले होते. सुलभा ही सिंदखेड राजा नगर परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती, तर प्रफुल्ल सरोदे हा उगला येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होता. दरम्यान, १२ वर्ष सुरळीत संसारात त्यांना दोन मुले झाली; परंतु प्रफुल्ल सरोदे हा गेल्या एक वर्षापासून पत्नीवर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होत असल्यामुळे सुलभाने सिंदखेड राजा येथे भावाच्याच घराशेजारी पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता. तिचा भाऊ वीज वितरण कंपनीत कार्यरत आहे. १0 डिसेंबर रोजी दुपारपासून नशेत असलेल्या प्रफुल्लने रात्री पत्नीच्या घरी जाऊन तिचा गळा चिरून खून केल्याचे मृतकाचा भाऊ धनंजय  लंभाटे यांनी सांगितले.धनंजय वसंतराव लंभाटे यांनीच पोलिसांत या प्रकरणी तक्रार दिली.  घटनेची माहिती कळताच ठाणेदार बळीराम गीते व त्यांचे सहकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक नेमणार व अन्य पोलीस कर्मचारी लगोलग घटनास्थळी पोहोचले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याचे मृत सुलभाचा भाऊ धनंजय लंभाटे यांनी सांगितले. घटनेनंतर मृत सुलभाचा पती तेथून फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.   

- चार महिन्यांपूर्वी मृतक सुलभाने प्रफुल्ल सरोदेपासून फारकती घेण्यासाठी दारव्हा कोर्टात अर्ज केला होता. सुलभाचा खून झाला तेव्हा त्यांची दोन्ही मुले ही आजी-आजोबाकडे ह७ोती.

टॅग्स :sindhaked raja rajwadaसिंदखेडराजा राजवाडाbuldhanaबुलडाणाCrimeगुन्हा