सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 12:06 AM2017-12-28T00:06:04+5:302017-12-28T00:07:41+5:30

Sindhkhedraja: Leader of Opposition in Saffad Gram Panchayat | सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व

सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायतवर भगवा, दरेगावमध्ये राकाँचे वर्चस्व

Next
ठळक मुद्देप्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयीदरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यातवरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला

 

लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत प्रस्थापित गटाला जबरदस्त धक्का देत शिवसेनेचे शिवाजी लहाने विजयी झाले असून, दरेगाव ग्रामपंचायत राकाँच्या ताब्यात गेली तर वरोडी येथे डॉ. भुजंगराव गारोळे यांनी एकतर्फी विजय मिळविला आहे.
सवडद ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदाकरिता चार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आजपर्यंत कारखाना आणि बारभाई यांच्यातच लढत होत असे. तेजराव देशमुख यांनी सतत तीन वेळा ग्रामपंचायतमध्ये विजय मिळविला होता. मागील वर्षी दोन्ही गट एकत्र येऊन गाव अविरोध केले होते. यावर्षी मात्र तेजराव देशमुख, रवींद्र देशमुख आणि शिवाजी लहाने अशा तीन विभागात तीन स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढविली. यात दोन्ही प्रस्थापित पॅनलचा पराभव करून शिवाजी लहाने यांनी विजय मिळविला. लहाने यांना ५७0 तर रावसाहेब देशमुख यांना ५१७ आणि रवींद्र देशमुख यांना ३७३ मते मिळाली. एका नवख्या युवा ब्रिगेडने विजय संपादन केल्याने प्रस्थापित नेत्यांना जबर चपराक बसली आहे. 
वरोडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सचिव डॉ.भुजंगराव गारोळे यांनी प्रा.सदानंद गुंजकर यांचा पराभव केला आहे, तर मोहाडी येथेही अशोक रिंढे यांनी वसंता इंगळे यांचा पराभव केला आहे. दरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत माजी जि.प. सदस्य अरुण वाघ यांच्या गटाच्या ज्योती साबळे विजयी झाल्या असून, त्यांनी नलिनी साबळे यांचा पराभव केला आहे. नसिराबाद ग्रा.पं. सरपंच पदाच्या निवडणुकीत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बुद्धू चौधरी यांच्या पत्नी रन्नू चौधरी यांनी विजय संपादन केला. पांग्री उगले ग्रामपंचायतमध्ये सीमा राठोड विजयी झाल्या आहेत, तर तांदूळवाडीमधून छाया बुंधे बिनविरोध झाल्या होत्या.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून सवडद येथे राजू वायसे, सुनीता लहाने, संतोष जाधव, नामदेव काटकर, लीलावती सपकाळ, जयश्री देशमुख, उषा केंधळे, दीपक देशमुख, वर्षा मोरे. वरोडी ग्रामपंचायतमधून हरिभाऊ गुंजकर, वंदना गवई, यमुना वानखेडे, सुनीता गिर्‍हे, एकनाथ गवई, एकनाथ खरात, अनिता गारोळे. मोहाडी ग्रामपंचायतमधून गजानन झगरे, आशा शिराळे, किसन साळवे, विमल काळे, नंदकिशोर रिंढे, जिजाबाई इंगळे, संगीता रिंढे, नसिराबाद ग्रामपंचायतमधून कैलास चव्हाण, कमल गाडेगकर, मीना जाधव, अनिल राठोड, सुरेखा राठोड, समाधान म्हस्के, सुमन राठोड आदी विजयी झाले.

युवकांमध्ये चैतन्य
सवडद ग्रामपंचायतमध्ये शिवाजी लहाने गटाचे चार सदस्य, तेजराव देशमुख गटाचे चार आणि रवींद्र देशमुख गटाला फक्त एकाच ठिकाणी विजय मिळाला आहे. शिवाजी लहाने यांनी विजयादशमीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची स्थापना करून युवक वर्गात चैतन्य निर्माण केले होते आणि संपूर्ण गाव या निर्णयाला शिवाजीच्या पाठीशी उभे राहिले होते. त्याची परतफेड मतदारांनी मतदान करून केली. आता सवडद गावात खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे सरकार आरूढ झाल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Web Title: Sindhkhedraja: Leader of Opposition in Saffad Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.