शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनचे संकेत; सुटीच्या दिवशीही बैठकांचे सत्र सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:12 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ही तहसिलदार आणि सहा एसडीओंची प्रदीर्घ काळत बैठक घेण्यात आली.

- नीलेश जोशी लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याचे संकेत मिळाले असून चार जुलै रोजी सुटीच्या दिवशीही जिल्हाधिकारी कार्यालयात १३ ही तहसिलदार आणि सहा एसडीओंची प्रदीर्घ काळत बैठक घेण्यात आली. त्यामुळे प्रसंगी येत्या एक दोन दिवसात याबाबत अधिकृत घोषणा होण्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.विभागीय आयुक्तांनी तीन जुलै रोजी अचानक बुलडाणा येथे भेट देवून कोरोना संसर्गाची साखळी रोखण्याच्या दृष्टीकोणातून जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. सोबतच कोरोना संसर्गाची जिल्ह्यात व्याप्ती वाढणार नाही, याबाबत जिल्हा प्रशासनास गंभीरतेने उपाययोजना उचलण्याच्याचे निर्देश दिले होते. दरम्यान याच कालावधीत जिल्ह्याचा हॉटस्पॉट ठरलेल्या मलकापूर तालुक्यात मधल्या काळात करण्यात आलेल्या उपाययोजनामुळे तेथे वर्तमान स्थितीत कोरोना संसर्गाचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे चित्र आहे. ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर चार जुलै रोजी पुन्हा जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांची सुट्टी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही बैठक उशिरापर्यंत सुरू होती. बैठकीत अधिकाºयांकडून तालुका निहाय सविस्तर माहिती व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये संदिग्ध आढळलेल्या व्यक्तींची संख्या, हायरिस्क कॉन्टॅक्ट असलेल्यांची संख्या तथा सध्याची कोरोना संसर्गाची स्थिती याबाबत सविस्तर माहिती संकलीत करीत संभाव्य लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी कशी होईल याचीही माहिती घेण्यात आली.पोलिस प्रशासनाचाही लॉकडाऊनचा प्रस्तावपोलिस प्रशासनानेही कोरोना संसर्गाचा वाढता धोका पाहता जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे तहसिलदार, एसडीओ यांच्याकडून त्यांच्या तालुक्यात व उपविभागातील एकंदर स्थितीचा विचार व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील संदिग्ध व्यक्तींची संख्या विचारात घेवून याबाबत जिल्हा प्रशासनाने सविस्तर माहिती मागवली आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक