शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

श्री रामनवमी उत्सवाची शेगावातील शेकडो वर्षांची परंपरा खंडीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:58 AM

वर्षापासूनची श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडीत झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात ‘लॉकडाऊन’ सुरु आहे. यामुळे गुरुवारी, २ एप्रिलरोजी संतनगरीत यावेळेस श्रीराम नवमी उत्सव साजरा होवू शकला नाही. अनेक वर्षापासूनची श्रीराम नवमी उत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडीत झाली आहे. केवळ पुजाऱ्यांच्याहस्ते सकाळी विधीवत पूजन झाले.श्री गजानन महाराज मंदिरात दरवर्षी श्रीराम जन्मोत्सव साजरा होत असतो. १६ मार्च पासून मंदिर सुद्धा पूर्णत: बंद आहे. उत्सवाला जिल्ह्यातूनच नव्हेतर या उत्सवात भक्तांची मांदियाळी पहायला मिळते. या उत्सवास २८ मार्चपासून सुरवात होणार होती. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या व वाढता संसर्ग लक्षात घेता शेगाव येथील श्री गजानन महाराज मंदिरातील ‘श्रीं’ची दर्शन सुविधा ३१ मार्चपर्यत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिले. त्यामुळे उत्सवास सुरुवात होवू शकली नाही. याशिवाय २ एप्रिलरोजी आयोजित श्री रामनवमी उत्सव सुद्धा स्थगित करण्यात आल्याचे मंदिर प्रशासनाच्या वतीने जाहिर करण्यात आले. रामनवमीला ‘श्रीं’च्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. यज्ञ, भजन, किर्तन, नगरपरिक्रमा आदी कार्यक्रम पार पडतात.डोळ्याचे पारणे फेडणारा हा उत्सव असतो. या उत्सवात १५०० हून अधिक दिंड्या, लाखो भाविक सहभागी होतात. मात्र कोरोनाने उत्सवावर विरजन पडले. अनेक भाविकांनी आपल्या घरातच ‘श्री राम चरित मानस’ या ग्रंथाचे पठण केले. शेगावप्रमाणेच खामगाव, मलकापूर, कमळनाथ (पिंपळगाव राजा), नांदुरा यासह जिल्हयातील अनेक ठिकाणी होणारा श्रीराम नवमी उत्सव साजरा होवू शकला नाही. सण उत्सवावरही पडले विरजणगुढीपाडवा सण २५ मार्च रोजी होता. मात्र याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन केले. यामुळे गुढीपाडव्यानिमित्त अनेक ठिकाणचे कार्यक्रम रद्द झाले. याशिवाय आज २ एप्रिल रोजी श्री रामनवमीचे कार्यक्रम सुध्दा स्थगीत करण्यात आले. येत्या ६ एप्रिलला महावीर जयंती तर ८ एप्रिलला हनुमान जयंती आहे. हे उत्सव सुध्दा स्थगीत राहणार असल्याने भक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

टॅग्स :ShegaonशेगावGajanan Maharaj Mandirगजानन महाराज मंदिर