शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

लॉकडाऊनमध्ये दुकाने बंद; मात्र दारू विक्री जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 11:33 IST

liquor sales are booming : २०२०-२१ मध्ये एक कोटी ३८ लाख १२ हजार ८८७ लिटर दारूची विक्री झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाऊनमध्ये मद्याची दुकाने बंद असतानाही जिल्ह्यात २०१९-२० च्या तुलनेत ९३ हजार ७७२ लिटर दारूची अधिक विक्री झाली असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात  एक कोटी ३७ लाख १९ हजार ११५ लिटर दारूची विक्री झाली होती. त्या तुलनेत २०२०-२१ मध्ये एक कोटी ३८ लाख १२ हजार ८८७ लिटर दारूची विक्री झाली आहे. दरम्यान, २०१९-२० च्या तुलनेत  देशी दारूची विक्री ५ टक्क्यांनी वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे. त्या तुलनेत विदेशी दारूची विक्री चार टक्क्यांनी घटली असून, बीअरची विक्री तब्बल १७ टक्क्यांनी घटली आहे. गंमत म्हणजे वाईनची विक्री जिल्ह्यात ५३ टक्क्यांनी वाढली असल्याचे एकंदरीत चित्र आहे. दुसरीकडे मद्यविक्रीच्या माध्यमातून जिल्ह्याला जवळपास नऊ कोटी रुपयांचा महसूलही प्राप्त झाला असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. गंम्मत म्हणजे वाईनच्या विक्रीतही ५३ टक्के वाढ झाली आहे. वर्षभरात ९ काेटी रूपयांचा महसूल राज्य उत्पादन शुल्क विभागाला मद्य विक्रीतून मिळाला आहे. तुलनेत तसा ताे कमी असला तरी लिटरमध्ये दारूची विक्री वाढली. 

एक कोटीची दारू जप्तलॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात मद्यविक्री बंद होती. मात्र, छुप्या पद्धतीने दारूची विक्री होत होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांच्या सहकार्याने केलेल्या कारवाईत जिल्ह्यात एक कोटी सात लाख १४ हजार ४७ रुपयांची विनापरवाना विक्री होत असलेली दारू जप्त केली आहे. या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १,१६३ प्रकरणात कारवाई करून ९३९ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

बीअर विक्री घटली, ‘देशी’ची चलतीजिल्ह्यामध्ये देशी दारूच्या विक्रीत ५ टक्क्यांनी २०१९-२० च्या तुलनेत वाढ झाल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाची आकडेवारी सांगते. विदेशी दारूच्या विक्रीत ४ टक्क्यांनी घट आली आहे, तर बीअरच्या विक्रीत तब्बल १७ टक्क्यांनी घट आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग