शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे जिल्हाभर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:51 IST

बुलडाणा:  शेतकर्‍यांच्या घरात आलेला माल शासकीय  हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शे तकरी वर्ग अडचणीत सापडला असून, ही एक प्रकारची शे तकर्‍यांची लूट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे  कमी दराने शेतीमाल खरेदी करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करावी, तसेच तत्काळ जिल्ह्यात हमी भाव खरेदी केंद्रे सुरू  करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा  देऊन जिल्हाभर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २३ ऑ क्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देहमीभावाने शेतीमाल खरेदी न करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करा - मागणीहमीभाव खरेदी केंद्र सुरू करा; अन्यथा तीव्र आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:  शेतकर्‍यांच्या घरात आलेला माल शासकीय  हमीभावपेक्षा कमी दराने खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शे तकरी वर्ग अडचणीत सापडला असून, ही एक प्रकारची शे तकर्‍यांची लूट आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे  कमी दराने शेतीमाल खरेदी करणार्‍यांवर फौजदारी दाखल  करावी, तसेच तत्काळ जिल्ह्यात हमी भाव खरेदी केंद्रे सुरू  करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा  देऊन जिल्हाभर शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी २३ ऑ क्टोबर रोजी ठिय्या आंदोलन केले.बुलडाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन  करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर  बुधवत, संजय गायकवाड आदींच्या नेतृत्वात शिवसेना  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन हमी भाव खरेदी केंद्र  सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. मोताळा येथे  संजय गायकवाड, भोजराज पाटील यांच्या नेतृत्वात  तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.  तर मेहकर येथे शे तकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी खा. प्रतापराव जाधव यांच्या ने तृत्वात २३ ऑक्टोबर रोजी जनसंपर्क कार्यालयापासून उ पविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  यावेळी शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय  अधिकारी डॉ. नीलेश अपार व तहसीलदार संतोष काकडे यांना  देण्यात आले.  सिंदखेड राजा येथे शेतकर्‍यांची आर्थिक  िपळवणूक थांबवावी, अन्यथा शिवसेना स्टाइलने तीव्र आंदोलन  करण्याचा इशारा आ.डॉ. शशिकांत खेडेकर दिला. तर खुल्या  बाजारात मूग, उडीद व सोयाबीनची अतिशय कमी भावाने  खरेदी सुरू आहे. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्यामुळे  तत्काळ शेतमालाची शासनामार्फत खरेदी करण्यात यावी, अशी  मागणी करत शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थित शिवसेना तालुका  प्रमुख बळीराम मापारी यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.   घाटाखालील संग्रामपूर येथे  शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शांताराम  दाणे व रवी पाटील झाडोकार यांच्या नेतृत्वात  तहसील  कार्यालयावर डफडे बजाओ आंदोलन करण्यात आले. तर शे तमालाची योग्य दराने शासकीय केंद्रावर खरेदी व्हावी या  मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख विजय  साठे यांच्या नेतृत्वात २३ ऑक्टोबर रोजी मलकापूर उपविभागीय  अधिकारी कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर करण्यात  आले. तसेच नांदुरा व खामगाव येथेही तहसीलदार यांना निवेदन  देऊन  शासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा  इशारा देण्यात आला.  

टॅग्स :agitationआंदोलन