शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 16:06 IST

बुलडाणा : पीककर्जासाठी चक्क शरीर सुखाची मागणी बँकेच्या शाखाधिकार्याने केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने ज्या प्रमाणे पोलिस ठाण्यात दक्षता समित्या असतात त्या प्रमाणे बँकस्तरावरही स्थानिक एक दक्षता समिती स्थापन केल्या जावी.

ठळक मुद्देनिलम  गोऱ्हे यांनी पीडित महिलेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून तिची परिस्थिती जाणून घेत शिवसेनेकडून या पीडित कुटुंबाला सर्वंकष मदत देण्याची तयारी दाखवली आहे.शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह जाऊन पीडित महिलेला बियाणे पोहोचवणार आहेत.

- नीलेश जोशी

बुलडाणा : पीककर्जासाठी चक्क शरीर सुखाची मागणी बँकेच्या शाखाधिकाऱ्याने केल्याचे प्रकरण उजेडात आल्याने ज्या प्रमाणे पोलिस ठाण्यात दक्षता समित्या असतात त्या प्रमाणे बँकस्तरावरही स्थानिक एक दक्षता समिती स्थापन केल्या जावी. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जावेत, अशी मागणी शिवसेना नेत्या निलम  गोऱ्हे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे. दाताळा पीककर्ज प्रकरणात त्यांनी २४ जून रोजी पीडित महिलेशी भ्रमणध्वनीवर संवाद साधून तिची परिस्थिती जाणून घेत शिवसेनेकडून या पीडित कुटुंबाला सर्वंकष मदत देण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, त्यानुषंगाने आता शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत हे आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह जाऊन पीडित महिलेला बियाणे पोहोचवणार आहेत. शिवसेना नेत्या निलम  गोऱ्हे यांनी यासंदर्भात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांच्याशीही २५ जून रोजी सविस्तर चर्चा केली आहे. दुसरीकडे निलम  गोऱ्हे यांनी २४ जून रोजी पीडित महिलेशी शेगाव येथील गोपाल शर्मा यांच्या भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. पोलिसांनी संबंधीत पीडित कुटुंबाची सुरक्षीत व्यवस्था केली असल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात हे कुटुंब त्यांच्या गावातील स्वत:च्या शेतावर होते. यावेळी पीडित महिलेने अनेक लोक येऊन विचारपूस करून निघून जात असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात या कुटुंबास मदतीच्या दृष्टीने कोणी प्रयत्न केले नसल्याचे आपल्या निदर्शनास आल्याचे त्या म्हणाल्या. एैण पेरणीच्या हंगामात सर्व कागदपत्रे पूर्ण असतानाही या महिलेस कर्ज देण्याचे टाळण्यात आले होते. त्यामुळे आतापर्यंतच बँकेने महिलेचे कर्ज मंजूर करून मदत द्यायला हवी होती. त्यासंदर्भात बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव व जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत यांना आपण कल्पना दिली आहे. ते लवकरच या कुटुंबाला शेतीच्या पेरणीसाठी बी बियाणे देणार असल्याचे त्या म्हणाल्या. यासोबतच अन्य काही मदत या कुटुंबाला लागल्यास तिही देण्याची शिवसेनेची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे २५ जूनलाच सायंकाळी पाच वाजता ५० हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान या पीडित महिलेला देण्यात येणार आहे. नीलम  गोऱ्हे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव आणि जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंधर बुधवत यांनी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांची भेट घेऊन अनुषंगीक कार्यवाही करण्याबाबत चर्चा ही केली आहे. बँकस्तरावर हवी समिती दाताळ््यासारखे गंभीर प्रकरण पाहता पोलिसांच्या जशा दक्षता समित्या आहेत त्या धर्तीवर बँक निहाय दक्षता समिती गठीत करण्याची गरज आहे. या समितीमध्ये किमान पाच ते सात स्थानिक व्यक्ती, अधिकारी यांचा समावेश राहल्यास असे गंभीर प्रकरण होणार नाही. सोबतच पीककर्जासंदर्भात असलेल्या अडचणी सोडविल्या जातीतील आणि असे प्रकार टाळण्यास मदत होईल. तसे झाल्यास बँकांचे उत्तरदायीत्व वाढले आणि कामामध्ये पारदर्शकता येईल, असे शिवसेना नेत्या निलम  गोऱ्हे म्हणाल्या.

टॅग्स :buldhanaबुलडाणाShiv Senaशिवसेना