शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव :  मन नदीत उत्खनन करताना मजूर जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 01:57 IST

शेगाव :  शेगाव आणि  बाळापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मन नदी पात्राजवळील तयार झालेल्या दरडमधून भिंगी मातीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने २ मजूर मातीखाली दबल्याची घटना  सोमवारी घडली. या घटनेत नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर मातीखाली पूर्णपणे दबलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये भोरु देशमुख व कैसर देशमुख हे दोन्ही मजूर जखमी झाले असून, दोघांना रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. 

ठळक मुद्देवेळीच मदत मिळाल्याने अनर्थ टळला रुग्णालयात उपचारार्थ भरती

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव :  शेगाव आणि  बाळापूर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मन नदी पात्राजवळील तयार झालेल्या दरडमधून भिंगी मातीचे अवैध उत्खनन सुरू असताना दरड कोसळल्याने २ मजूर मातीखाली दबल्याची घटना  सोमवारी घडली. या घटनेत नागरिकांच्या अथक परिश्रमानंतर मातीखाली पूर्णपणे दबलेल्या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये भोरु देशमुख व कैसर देशमुख हे दोन्ही मजूर जखमी झाले असून, दोघांना रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.      शेगाव तालुक्यातील मानेगाव आणि  बाळापूर तालुक्यातील लोहारा शिवारातील  मन नदीसह सर्व नदी-नाल्यांमधून भिंगी आणि रेतीचे अवैध उत्खनन दररोज सुरू आहे. रात्रंदिवस रेतीचा अवैध उपसा सुरू असून, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने रेती चोरट्यांची हिंमत वाढली आहे. परिसरातील अनेक रेती घाटांवरून विना रॉयल्टीची किंवा एकाच रॉयल्टीवर दिवसभर रेतीची वाहतूक सुरू असते. यामध्ये सोमवारी मानेगाव- लोहारा शिवारातील मन नदीच्या पात्रालगतचे  भूभाग खोदून भिंगी माती काढण्याच्या प्रयत्नात दरड कोसळून भुरू बहेमूद देशमुख आणि कैसर देशमुख दोन्ही राहणार लोहारा हे मजूर मातीच्या ढिगार्‍याखाली पूर्णपणे दबले. दरड कोसळताच इतर मजुरांनी आरडाओरड केली असता, मानेगाव या गावातील नागरिकांनी घटनास्थळ गाठून अथक परिश्रमानंतर दबलेल्या मजुरांना काढले. दोघांची प्रकृती स्थिर असून, त्यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळ गाठून दबलेल्या मजुरांना बाहेर काढले.   मन नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात रेतीचा उपसा होत असून, अहोरात्र होणार्‍या वाहतुकीने या परिसरातील रस्तेही उखडले आहेत. सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना महसूल प्रशासन मात्र कोणतीही कारवाई करताना दिसत नाही. 

तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीया अपघातातील घटनास्थळ हे बाळापूर तालुक्यात येत असून, येथील तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्या दुर्लक्षामुळेच अशी घटना तिसर्‍यांदा घडल्याने त्यांच्या विरुद्धही कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Balapurबाळापूरriverनदी