जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ सृष्टीवरील विविध कार्यक्रमात शाहिरी कार्यक्रमाने चांगलीच बहार आणली. राज्यभरातून आलेल्या विविध शाहीर आणि त्यांच्या पथकाने चार तास चाललेल्या कार्यक्रमाचा फेसबुकवर असलेल्या लाखो प्रेक्षकांना खिळून ठेवले. जिजाऊ सृष्टीवर विविध कार्यक्रमांची रेलचेल असते, विचारांची देवाण-घेवाण हे येथील कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यात शाहिरांनी ही प्रबोधनात्मक पोवाडे सादर करून या विचारांना बळ दिले. सामाजिक गीते, लोक गीते, प्रबोधनात्मक गीते, भारुड, पोवाडे याठिकाणी सादर झाले. या कार्यक्रमात शाहीर दिनकर नाळणीकर, अशोक बागुल, दिलीप पिंपळे, लक्ष्मण ताकघुमे, शहाजी देसाई, जिजाबाई जाधव, भारत झिने, बाबूराव पांदूव, अरविंद घोगरे, अनिल बदर्गे, रामानंद उगले, स्वप्नील डोंगरे, राजू चव्हाण, गुलाबराव नाळनिकर, भारत मुंजे यांनी सहभाग घेतला होता.
शाहिरीने जिजाऊ सृष्टी दुमदुमली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:30 IST