शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

शिवप्रतिष्ठानचा बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला सन्मान मोर्चा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 1:02 AM

बुलडाणा : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता संगम चौकातून हा मोर्चा निघाला. जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शिष्टमंडळाच्यावतीने  अपर जिल्हाधिकाºयांशी  चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

ठळक मुद्देसंभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : संभाजी भिडे गुरुजी यांच्यावरील अ‍ॅट्रॉसिटी व दंगलीचे गुन्हे मागे घेण्यासह अन्य मागण्यांसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने २८ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सन्मान मोर्चा काढण्यात आला. दुपारी १२ वाजता संगम चौकातून हा मोर्चा निघाला. जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. शिष्टमंडळाच्यावतीने  अपर जिल्हाधिकाºयांशी  चर्चा करून मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. भिडे गुरुजींवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावे तसेच मिलिंद एकबोटे, धनंजय देसाई, वीरेंद्र तावडे यांची त्वरित मुक्तता करावी, गोविंद महाराज समाधीजवळ वादग्रस्त फलक कुणी लावला, याबाबत चौकशी करून संबंधितांना अटक करा, पुणे येथील एल्गार परिषदेत भडकावू भाषणे करणाºया जिग्गेश मेवाणी, उमर खालीद, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, माजी न्यायमूर्ती कोळसे पाटील, सुधीर ढवळे, संतोष शिंदे, ज्योती जगताप, हर्षाली पोतदार, मौलाना अझरनी यांना दंगलीसाठी जबाबदार धरून चौकशी करून अटक करावी, राहुल फटांगडेच्या मारेकºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करून कारवाई करा, भिडे गुरुजींच्या नावाने फिर्याद देणाºया महिलेची चौकशी करावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या.  मोर्चात   मोठ्या संख्येने युवकांनी  सहभाग नोंदवला. या मोर्चाला अखिल भारतीय कैकाडी महासंघ, आदिवासी वाल्मीकलव्य संघटना, एकलव्य ब्रिगेड भिल्ल समाज संघटना, मेहतर वाल्मीकी समाज संघटना, अखिल भारतीय भोई समाज, अखिल भारतीय धनगर समाज संघर्ष समिती, जय भगवान महासंघ, अखिल भारतीय हिंदू खाटीक संघटना, राष्ट्रीय गुरव समाज महासंघ, जीवा सेना, शिंपी समाज बुलडाणा, आॅल इंडिया सोनार फेडरेशन, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ, बंजारा सेवा संघ, अखिल भारतीय क्षेत्रीय महासंघ, अंतर्गत महाराणा सेवा समिती, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, धर्मवीर आखाडा, टायगर ग्रुप, दयावान संघटना, रुद्र ग्रुप, मातोश्री ग्रुप, जय भवानी मंडळ, शिव सूर्य मित्र मंडळ, राजमाता मित्र मंडळ, कोंढाना मित्र मंडळ, जुनागाव मित्र मंडळ, गौर सेना बुलडाणा, गुरुद्वार गुरुनानक दरबार साहेब बुलडाणा, मी वडार महाराष्ट्राचा बुलडाणा, हिंदुराज प्रतिष्ठान अमडापूर, हिंदू राष्ट्रसेना मलकापूर, विश्व हिंदू महासंघ मलकापूर, शिव युवा प्रतिष्ठान मलकापूर, सुरेश कुमार शर्मा म. प्र. काँ. सेवादल मलकापूर, रुद्र बहूद्देशीय समिती बुलडाणा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , ब्राम्हण जागृती सेवा संघ,  संत गाडगे महाराज सेवा मंडळ, महाराष्ट्र नरहरी सेना चिखली, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना चिखली, स्वराज्य क्रांती युवा संघटना चिखली, नाभिक समाज जीवा-शिवा-युवा बहूद्देशीय चिखली, महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुलडाणा, वंदे मातरम् मित्र मंडळ कोºहाळा बाजार अशा विविध समाज संघटनांनी पाठिंबा दिल्याची माहिती शिवप्रतिष्ठानच्या पदाधिकाºयांनी दिली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीagitationआंदोलन