अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 02:15 PM2019-12-21T14:15:52+5:302019-12-21T14:16:00+5:30

आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते.

Sexual abuse of a minor; Seven years rigorous imprisonment for the accused | अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; आरोपीस सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बुलडाणान्यायालयाने ईश्वर विनोद विरशीद यास सात वर्षे सक्तमजुरी आणि २१ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, प्रकरणात पीडित मुलास दहा हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. बुलडाणा येथील विशेष न्यायाधीश श्रीमती सी. आर. हकारे यांनी हा निकाल दिला.
बुलडाणा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने ३१ जानेवारी २०१९ रोजी तक्रार दिली होती. आरोपी ईश्वर विनोद विरशीद याने पीडित मुलास तो घरी एकटा असताना टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी बोलावले होते. दरम्यान टिव्ही पाहत असताना दरवाजा लावून ईश्वर विनोद विरशीद याने या ११ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला. सोबतच जीवे मारण्याची धमकीही दिली. या घटनाक्रमापूर्वीही आरोपीने एकदा या अल्पवयीन मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत पीडित मुलाच्या आईने पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण यासह अन्य काही कलमानुसार गुन्हा दाखल करून ईश्वर विनोद विरशीद विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान वादी पक्षातर्फे पीडित मुलगा, त्याची आई, पंच साक्षीदार, संबंधीत शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी अशा एकूण सात जणांची साक्ष तपासण्यात आली. त्यामध्ये पीडित मुलगा, त्याची आई व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. अन्य साक्षीदारांचीही साक्ष प्रकरणाशी सुसंगत ठरली होती.
या प्रकरणात वादी पक्षातर्फे अर्थात सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सरकारी वकील वसंतराव लक्ष्मण भटकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडली व आरोपी विरोधात प्रबळ असा युक्तीवाद केला. सोबतच आरोपीस अधिकाधिक शिक्षा ठोठावण्याची मागणी केली होती. वादी, प्रतिवादींचा युक्तीवाद ऐकूण बुलडाणा न्यायालयाच्या न्यायाधिश श्रीमती सी. आर. हकारे यांनी आरोपी ईश्वर विनोद विरशीद यास सर्व साक्षीपुरावे व दिलेले निवाडे यांचा विचार करून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. सोबतच २१ हजार रुपयांचा दंड ठोठावला. विविध कलमांच्या अनुषंगाने याप्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. या सर्व शिक्षा आरोपीस एकत्रीत भोगावयाच्या आहेत. दरम्यान या प्रकरणात आरोपीस करण्यात आलेला दंड न भरल्यास आरोपीस आणखी एक महिना कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस निरीक्षक संतोष तेजराव जवंजाळ यांनी केला तर पैरवी म्हणून किशोर कांबळे यांनी सहकार्य केले.

Web Title: Sexual abuse of a minor; Seven years rigorous imprisonment for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.