नांदुरा : भाजपाचे माजी नगरसेवक प्रकाश खंडेलवाल यांच्या धान्य दुकानातून अज्ञात चोरट्यांनी सा त हजार रूपये रोख लंपास केले. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. शहरातील डॉ.हेडगेवार या मुख्य मार्गावर गजानन महाराज व्यापारी संकुलात प्रकाश खंडेलवाल यांचे धान्य विक्रीचे दुकान आहे. या दुकानाचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी मध्यरात्री दुकानात प्रवेश करून दुकानातील गल्ल्यात असलेले सात हजार रुपये रोख लंपास केले.
दुकानातून सात हजार रुपये लंपास
By admin | Updated: September 28, 2014 00:27 IST