शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

बुलडाणा जिल्ह्यातील सात पूल धोकादायक

By admin | Updated: June 24, 2017 05:42 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : पावसाळय़ातील पुरादरम्यान उद्भवते बिकट स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: बर्‍याच वेळा पावसाळ्यात नदी-नाल्यांना पूर आला की, पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावांचा संपर्क तुटतो. यामुळे जीवितहानी होण्याची शक्यताही जास्त असते. त्यामुळे नदी व मार्गावरील पुलनिर्मिती करताना गांभीर्याने पाहिले जाते; परंतु जिल्ह्यात सद्यस्थितीत ब्रिटिशकाळी २१ पूल असून, त्यापैकी सात पुलांची अवस्था धोकादायक आहे.गावाच्या विकासासाठी शासनाने ग्रामीण भागात बर्‍याच ठिकाणी नवीन पुलांची निर्मिती केली आहे. शिवाय बरेच पूल १९२६ ते १९३९ या ब्रिटिश काळात बांधण्यात आले आहे. या पुलांची मजबुती कायम ठेवण्यासाठी पुलांची उंची कमी ठेवण्यात आली आहे. नदी-नाल्यांवर निर्माण केलेले पूल मजबूत असणे आवश्यक आहे; मात्र बर्‍याच वेळा पावसात ग्रामीण भागात नदीला पूर आल्यामुळे पुलांच्या सुरक्षा कठड्याची पडझड होऊन नुकसान होते. काही वेळा यामुळे गावाचाही संपर्क तुटतो. बुलडाणा शहर ब्रिटिशकाळात ब्रिटिश प्रशासनाचे मुख्यालय होतो. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाबाबत जागरूकता दाखवत ब्रिटिश अधिकार्‍यांनी येथील विविध नद्यांवर अनेक पुलांची निर्मिती केले. यापैकी सद्यस्थितीत सात पुलांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो; मात्र या पुलांची प्रशासनाकडे नियमित देखभाल होत नसल्यामुळे सर्वच पूल जर्जर झाले आहे. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या पुलांवर प्रवास करावा लागतो.धाड-धामणगाव रोडवरील पूल धोकादायकधाड: गत २0 ते २२ वर्षांंंपूर्वी बांधण्यात आलेल्या धाडनजीक बाणगंगा नदीवरील पुलामुळे रहदारी आणि नागरी वस्तीस धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या सुरक्षेबाबत चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप कुठलीच उपाययोजना न केल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीचे पाणी या पुलावरून वाहते. शिवाय परिसरातील कचरा पुलात अडकत असल्यामुळे हा पूल नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धाडनजीक धामणगाव धाड रोडवर बाणगंगा नदीवर करडी धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या साडव्याचे पाणी ही गावलगत जुन्या फरशी परिसरात येऊन पोहचल्यामुळे त्यावेळी चिखली सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईत सिमेंटची पाइप टाकून बाणगंगा नदीवर २0 फूट रुंदीचा आणि साधारण २00 फुटांपेक्षा अधिक लांबीच्या पुलाचा पूल बांधला. पुलाची उंची कमी असल्यामुळे जास्त पाऊस झाला की या पुलापर्यंंंत धरणाचे पाणी येऊन साचले आणि नदीला पूर आला की, पुलामध्ये काडीकचरा, गाळ, झाडी-झुडपे अडकून पुराचे पाणी पुलावरून वाहते, बर्‍याच वेळा हे पाणी गावात शिरले, त्यामुळे या पुलाची एक बाजू ढासळून गेली. त्यामुळे पुलावरून पाणी वाहत असतांना पाण्यात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सुरूवातीच्या काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक उन्हाळ्यात पुलातील गाळ, साचलेला कचरा साफ करून पुलाचे पाइप मोकळे करण्याचा नियमित उपक्रम चालू ठेवला होता; परंतु मागील काही वर्षांंंपासून हा उपक्रम बंद झाला आहे. या ठिकाणी बांधकाम विभागाकडून नवीन पुलासाठी सर्वेक्षण केले होते. ब्रिटिशकाळीन पूल मार्ग                                  नदी                  वर्षमलकापूर - जालना            (आमना)             १९३९मलकापूर - जालना           (खडकपूर्णा)          १९२६जालना - मेहकर               (पैनगंगा)             १९२६ नांदुरा - मोताळा              (विश्‍वगंगा)           १९३३येरली                                (पूर्णा )             १९२६टिवरोडा                            (पूर्णा )             (उपलब्ध नाही )खामगाव - चिखली             (मन)               (उपलब्ध नाही )