शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे मीटर अंतरावर सात खड्डे; खामगावातील मुख्य रस्त्यावरील परिस्थिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:03 IST

खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देखड्डेमुक्तीची घोषणा फोलसार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्याची दिली होती ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते.राष्ट्रीय महामार्ग तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास प्रारंभ केला. तर राज्यातील सर्वच रस्त्यावरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्यात येणार असल्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. मात्र, पालकमंत्र्यांच्या गावातील खड्डे बुजविण्यातच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दूजाभाव केल्याचे उघडकीस आले असून, बस स्थानकासमोरील काही खड्डे बुजविल्यानंतर बस स्थानक टर्निंग ते विकमशी चौकापर्यंतचे मोठे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. बस स्थानक टर्निंग-विकमशी चौकापर्यंतच्या सुमारे तीनशे मीटर अंतरापर्यंतच्या रस्त्यावर मोठे सात खड्डे असून इतरही लहान खड्डे या रस्त्यावर आहेत. त्याचप्रमाणे हाच रस्ता काही ठिकाणी पूर्णपणे उखडला आहे.  त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्डे बुजवा     ही मोहिम केवळ दिखावा    असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे शहरातील इतर रस्त्यांचीही हीच अवस्था  कायम असून, संबधीत प्रशासनाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

खड्डे बुजविण्यासाठी मुरूमाचा वापर!राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शहरात डांबराचे पॅचिंग करण्यात आले. तर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमध्ये चक्क मुरूम टाकण्यात आला. जड वाहनांच्या वर्दळीमुळे खड्ड्यांमधील मुरूम  रस्त्यावर विखुरला गेल्याने, वाहन चालकांना कमालिचा त्रास सहन करावा लागत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावchandrakant patilचंद्रकांत पाटीलBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकर