शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन मोठ्या गुन्ह्यांसह सात घटनांचा पोलिसांकडून छडा

By अनिल गवई | Updated: June 25, 2023 20:03 IST

शहर, शिवाजी नगर पोलिस स्टेशनच्या डीबी पथकाची यशस्वी कामगिरी

खामगाव: शहर आणि शिवाजी नगर पोलिसांनी सांघिक पद्धतीने काम करीत दोन मोठ्या घटनांचा अल्पावधीतच छडा लावला. याबाबत शहर परिसरातील इतर पाच घटनांमध्ये आरोपी अटक करण्यात आले. काही गुन्ह्यात मुद्देमाल जप्त केला. खामगाव उपविभागातील पोलिसांची कामगिरी समाधानकारक असून आगामी काळातही पोलिसांची चमकदार कामगिरी दिसेल, असा विश्वास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांनी रविवारी दिला.

खामगाव शहर आणि शिवाजी नगर पोलिसांच्या संयुक्त कामगिरीबद्दल माहिती देण्यासाठी रविवारी सकाळी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. खामगाव शहर आणि उपविभागातील काही आरोपींचा डेटा तयार केला जात आहे. याद्वारे गुन्ह्याचा छडा लावण्यात येत असल्याचे ठाकरे म्हणाले. या पत्र परिषदेला शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक शांतीकुमार पाटील, शिवाजी नगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक अरूण परदेशी उपस्थित होते. 

या गुन्ह्याचा लावला छडा...शिवाजी फैल खामगाव येथील कृषी केंद्राचे गोदाम फोडणाऱ्या टोळीला जेरबंद करून त्यांच्याकडून ९ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याचप्रमाणे शिवाजीनगर पोलिस स्टेशन हद्दीतील ९ लाखांच्या लुटमारीप्रकरणी डीबी पथकाने यशस्वी छडा लावला. याशिवाय सराफा बाजारातील चोरी, खामगाव बसस्थानक, बाळापूर फैलातील शाळा, कृषी उत्पन्न बाजार समितीतील चोरीचाही यशस्वी तपास दोन्ही डी. बी. पथकाने केल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी