शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

अपक्ष उमेदवारांमुळे सप्तरंगी लढत!

By admin | Updated: October 6, 2014 23:53 IST

युती, आघाडीच्या घटस्फोटानंतर जळगाव जामोद मतदारसंघातील लढत सप्तकोनी.

नानासाहेब कांडलकर /जळगाव जामोद (बुलडाणा)जळगाव जामोद मतदारसंघातून सन १९५२, १९६२ व १९७२ अशा तीन वेळा शेकापचे भाई के.आर. पाटील हे विजयी झाले होते. तर सन १९९0, १९९५ व १९९९ अशा सलग तीन निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करून कृष्णराव इंगळे यांनी हॅट्ट्रीक करण्याचा पहिला विक्रम नोंदविला होता. आता या विक्रमाची बरोबरी करण्याचा प्रयत्न भाजपाचे डॉ.संजय कुटे हे करीत आहे. सन २00४ व २00९ मध्ये सलग दोन वेळा विजय प्राप्त केल्यानंतर भाजपाकडून डॉ.संजय कुटे हे तिसर्‍यांदा रिंगणात उतरले आहेत. जर ते विजयी झाले तर एकाच पक्षाकडून सलग तीन वेळा विजय मिळविणारे ते एकमेव ठरतील. कारण कृष्णराव इंगळे यांची हॅट्ट्रीक ही दोन पक्षांची होती. प्रथम सेना व नंतर काँग्रेसकडून ते विजयी झाले होते. मागच्या निवडणुकीत दुसर्‍या क्रमांकावर राहिलेले भारिप-बमसंचे प्रसेनजित पाटील यांनी यावेळी प्र थम क्रमांकावर येण्यासाठीचे नियोजन केले आहे. मागील निवडणुकीत मिळालेली मते कायम ठेवत, त्यामध्ये नवीन मतदारांना जोडण्याचे त्यांचे पध्दतशीर प्रयत्न सुरू आहेत. तर मागच्या वेळी शेगाव शहर सोडून इतर मतदारांसाठी नवखे असणारे काँग्रेसचे उमेदवार रामविजय बुरूंगले यांनी तिसरे स् थान पटकाविले होते. गत पाच वर्षात आपला संपर्क कायम ठेवत त्यांनी वेगळी ओळख निर्माण केल्याने ते तिसर्‍या क्रमांकावरून आता पहिल्या स्थानावर येण्यासाठी धडपड करित आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आ.स्व.तुळशिरामजी ढोकणे यांचा मुलगा प्रकाशसेठ ढोकणे हे प्रथमच विधानसभेच्या मैदानात उतरले आहेत. तर शिवसेनेचे संतोष घाटोळ व मनसेचे गजानन वाघ हे सुध्दा प्रथमच विधानसभेची निवडणूक लढवित आहे. गजानन वाघ यांची शिवसेनेच्या माध्यमातून या म तदार संघात चांगली ओळख आहे. परंतु त्यांनी मध्यंतरी पक्षांतर करून आता रेल्वे इंजिन चालविण्यासाठी घेतले आहे. तुलनेत मनसेचे या मतदार संघात नेटवर्क कमी आहे. सेनेचे उमेदवार संतोष घाटोळ यांनाही मतदारांना ओळख करून द्यावी लागत आहे. या संपर्काचे रूपांतर मतकोटा वाढविण्यास कसे करता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे.