शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंशिस्त हाच कोरोना लढ्यातील मुलमंत्र- सुमन चंद्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 15:58 IST

स्वयंशिस्त हाच कोरोना लढ्यातील मुलमंत्र असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्वयंशिस्त हाच कोरोना लढ्यातील मुलमंत्र असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे जवळपास सर्वच अधिकार एकवटल्या गेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी  संवाद साधला असता ही बाब त्यांनी स्पष्ट केली.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी जिल्ह्यात काय उपाययोजना केल्या आहेत.?यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. ३१ मार्च पर्र्यंत जिल्ह्याती सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेले आहे. जीवनावश्यक वस्तू व मेडीकल स्टोअर्स तेवढे वगळे आहे.

गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी आदेश दिले आहेत काय?गर्दीची ठिकाणे टाळण्यासाठी ‘नो गॅदरींग’च्या सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील आठवडी बाजार आणि सर्व आस्थापना ३१ मार्च पर्यंत बंद  ठेवण्याचे निर्देश दिले आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सुचना व निर्देशांच योग्य व गुणात्मक पद्धतीने जिल्ह्यात पालन करण्यात येत आहे.

आरोग्य विषयक आपली सज्जता कितपत आहे?कोरोना संसर्ग टाळण्याच्या दृष्टीने आपण सजग आहोत. जिल्ह्यात शेगाव, खामगाव आणि बुलडाणा येथे तीन आयसोलेशन कक्ष उभारण्यात आले असून १०० बेडचा क्वारंटीन कक्ष ही बुलडाण्यात उपलब्ध आहे. कोरोना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास प्राधान्य दिलेले आहे.

कोरोना संसर्गाबाबत जिल्ह्यातील स्थिती कितपत सुरक्षीत आहे.?सुदैवाने जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळलेला नाही. संशयीत सहा जणांचे नुमने आपण विषाणू तपासणी प्रयोग शाळेस पाठविले होते. त्याचे नमुनेही निगेटीव्ह  आहेत. स्वयंशिस्त व प्रतिबंध हाच कोरोना दूर  ठेवण्याचा उपाय आहे.

लग्न समारंभाबाबत काय सुचना आहेत?गर्दी टाळण्यासाठी लग्न समारंभ पुढे ढकलावेत किंवा अगदी साध्या पद्धतीने लग्न उरकावे याबाबत आपण आवाहन केले आहे, त्याबाबत निर्देशही दिले आहे. सोबतच विवाह हे  आटोपशीरपणे व्हावे, यासाठी रजिस्टर पद्धतीने विवाह करण्यास प्राधान्य दिले जावे. त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर यंत्रणेला सज्जतेचे आदेश दिले आहे. तशा उपाययोजनाही आपण करत आहोत. बुलडाण्यातील एका माजी आमदाराच्या कन्येचा विवाहही अगदी साध्या पद्धतीने करण्यात आला. त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. धार्मिक स्थळी गर्दी टाळण्याच्या सुचना आहेत.

 गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या नागरिकांना सुचना दिल्या आहेत.स्टेडीयमही बंद करण्याच्या आपल्या हालचाली आहेत. जनमानसात याविषयी जागृती व्हावी, यादृष्टीकोणातून जिल्हास्तरावरून अपेक्षीत असलेल्या बाबी पूर्ण केल्या. परदेशतून आलेल्या नागरिकांवर वॉच आहे. १२ विदेशी  नागरिकांना होम क्वारंटीनमधून सुटीही देण्यात आली आहे.- सुमन चंद्रा

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस