शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

बिजोत्पादन : बुलडाणा जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच मिळणार बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 11:08 IST

Buldhana News : बिजोत्पादनाचे यंदाचे उद्दिष्ट जवळपास १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्याला झोडपले आहे. त्याचा फटका बिजोत्पादनात राज्यात पहिल्या क्रमांकावर असलेल्या बुलडाणा जिल्ह्याला बसला आहे. त्यामुळे बिजोत्पादनाचे यंदाचे उद्दिष्ट जवळपास १६ टक्क्यांनी कमी करण्यात आले आहे. सोबतच गतवर्षीच्या तुलनेत ५४ टक्के शेतकऱ्यांनाच बिजोत्पादनासाठी बियाणे उपलब्ध होणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत. परिणामस्वरुप बुलडाणा येथील महाबीजच्या जिल्हा कार्यालयामध्ये बिजोत्पादक शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी १ जून रोजी गर्दी केली होती. गेल्यावर्षी बुलडाणा जिल्ह्यात ११ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर महाबीजअतंर्गत बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात आला होता. त्यात ५ हजार ६०० शेतकरी सहभागी झाले होते. मात्र, २०१९ आणि २०२० या दोन्ही वर्षात परतीच्या पावसाने बुलडाणा जिल्ह्यास चांगलेच झोडपले होते. त्यामुळे मूग, सोयाबीन, उदीड, तूर आणि कापसाच्या बिजोत्पादन कार्यक्रमास फटका बसून अपेक्षित बियाणे उपलब्ध हाेऊ शकले नाही. अर्थात उत्पादन झाले. मात्र, ते तपासणीमध्ये पास झाले नाही. परिणामस्वरुप ५६ हजार क्विंटल कच्चे बियाणे यंदा कमी उपलब्ध झाले आहे. पीक काढणीच्या काळात परतीच्या पावसाने जिल्ह्यात कहर केल्याने हा फटका बसला आहे.याचा विपरित परिणाम महाबीजच्या चालू हंगामाच्या उद्दिष्टावर झाला असून, यंदा ९ हजार ७३३ हेक्टरवरच बिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये यावर्षी ३ हजार ३२ शेतकऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. यंदा प्रामुख्याने कापूस ५ हेक्टर (सुधारित), ज्यूट १६० हेक्टर, मूग १८४ हेक्टर, सोयाबीन ८ हजार ४४४ हेक्टर, उडीद ७२३ हेक्टर, तुरीचे २१६ हेक्टरवर बिजोत्पादन करण्यात येणार असल्याची माहिती महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मोराळे यांनी दिली.

६० कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभबिजोत्पादन कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना चिखली, खामगाव आणि मेहकर येथील बाजार समित्यांमधील महत्तम भावाच्या २० ते २५ टक्के अधिक मोबदला पास केलेल्या बियाण्यावर महाबीज देते. त्यामुळे शेतकरी प्रामुख्याने या बिजोत्पादन कार्यक्रमाकडे वळत आहेत. सरासरी दर हे हमीभावापेक्षा कमी आले तर जो फरक आहे तो शासनाकडून बिजोत्पादकाला देण्यात येतो. त्यामुळेच यावर्षीही महाबीजच्या जिल्हा कार्यालयात बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. सध्या बियाणे वाटपास महाबीजने प्रारंभ केला आहे. बुलडाणा, चिखली, मेहकर, कामगाव मलकापूर, देऊळगाव राजा येथील महाबीजच्या कार्यालयातून शेतकऱ्यांना बिजोत्पादन कार्यक्रमासाठी कच्चे बियाणे दिले जात आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीFarmerशेतकरीMahabeejमहाबीज