शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
4
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
5
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
6
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
7
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
8
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
9
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
10
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
11
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
12
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
13
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
14
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
15
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
16
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
17
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
18
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
19
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
20
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?

गोळीबार प्रकरणातील दुसरा आरोपी अटकेत

By admin | Updated: July 5, 2017 00:37 IST

मलकापूर : मुख्याध्यापकावर गोळी झाडल्याप्रकरणी दोन आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : येथील चर्चेचा विषय मुख्याध्यापकावर गोळी झाडल्याप्रकरणी मलकापूर पोलिसांनी ३ रोजी दुसऱ्या आरोपीस अटक केली. या प्रकरणात आरोपींची संख्या दोन झाली असून, या दोघांनाही एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली.यासंदर्भात घटनाक्रम असा की, मोताळा तालुक्यातील भिकमसिंह पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्यावर त्यांच्या महाराणा प्रताप नगरातील राहत्या घरासमोर मोबाइलवर बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गोळी झाडल्याची घटना २८ जूनच्या रात्री १०.४० वा. सुमारास घडली. त्यामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली होती.या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकारीदेखील झाले होते. मलकापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांच्या नेतृत्वात २९ जून रोजी या प्रकरणातील दोघांपैकी एक असलेल्या सावनसिंह मदनसिंह राजपूत याला अटक केली. त्याला पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश मलकापूर न्यायालयाने दिला दुसऱ्या आरोपीच्या तपासात पोलीस यंत्रणा होती. त्यात संदीप ऊर्फ नाना ओंकार येसी या दुसऱ्या आरोपीस पोलिसांनी ३ जुलै रोजी अटक केली. आज ४ जुलै रोजी गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना एक दिवसाच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी दिली.दरम्यान, गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी मुख्याध्यापक रवींद्रसिंह गुलाबसिंह राजपूत यांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे शल्यचिकित्सक डॉ.अरविंद कोलते यांनी सांगितले. संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या या गोळीबार प्रकरणात दोन्ही आरोपींचा अवघ्या चार दिवसात छडा लावण्यात मलकापूर पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे व सहकाऱ्यांना यश आल्याचे या निमित्ताने स्पष्ट होत आहे.