शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

देखभाल दुरूस्तीच्या अनुदानातून शाळांचे  सॅनिटायझेशन होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 15:08 IST

Buldhana News देखभाल दुरूस्तीसाठी मिळणाऱ्या अनुदानातूच शाळांचे सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) व इतर उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

ठळक मुद्दे ग्रामपंचायत किंवा स्थानिक पातळीवरून हा खर्च करावा लागणार आहे. विनाअनुदानीत शाळा अडचणीत सापडल्या आहेत. 

- ब्रह्मानंद जाधव    लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू केले जाणार आहेत. कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनुदानीत शाळांना देखभाल दुरूस्तीसाठी मिळणाऱ्या अनुदानातूच शाळांचे सॅनिटायझेशन (निर्जंतुकीकरण) व इतर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. परंतू यामध्ये विनाअनुदानीत शाळा अडचणीत सापडल्या आहेत. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर इयत्ता नववी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात येत आहे. परंतू कोरोना अद्याप संपलेला नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने  कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे शिक्षण विभगााने लक्ष केंद्रीत केले आहे. अनुदानीत शाळांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्गांचे सॅनिटायझेडान (निर्जंतुकीकरण), थर्मल गन आदी स्वरूपांतील दक्षतेच्या उपाययोजनांचा खर्च कोठून करायचा, असा प्रश्न जिल्ह्यातील अनुदानित खासगी शाळांसमोर आहे.  परंतू हा सर्व खर्च अनुदानीत शाळांना मिळणाऱ्या देखभाल दुरूस्तीच्या अनुदानातून करावा लागणार आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमिक शाळांना ग्रामपंचायत किंवा स्थानिक पातळीवरून हा खर्च करावा लागणार आहे. विनाअनुदानीत शाळांना  निर्जंतुकीकरणाचा सर्व खर्च स्वत:कडून भागवावा लागणार आहे.  विद्यार्थी संख्या लक्षात घेता किमान पाच ते सहा थर्मल गन आणि रोज दोन ते अडीच लिटर सॅनिटायझर लागणार आहे. या शाळांना गेल्या वर्षी वेतनेतर अनुदान मिळालेले नाहीत.  त्यामुळे नेमका खर्च कसा करावा, असा प्रश्न आहे.

शाळा सुरू करण्यापूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यकच आहे. आपण शाळेत तशी व्यवस्था करत आहोत.  सर्वच शाळांना वेतनेतर अनुदान वेळेवर मिळत नाही. त्यामुळे अडचणी येतात.                

 - सुरेश हिवरकर,   मुख्यध्यापक. लोणी गवळी, ता.मेहकर.  

सोमवारपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होत आहेत. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी लागणारा खर्च शाळांना स्थानिक स्तरावर करावा लागणार आहे. अनुदानीत शाळांना देखभाल दुरूस्तीसाठी मिळणारे अनुदान त्यासाठी वापरावे लागेल.      

 - उमेश जैन, उपशिक्षणाधिकारी. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळा