शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

गटशिक्षणाधिकाऱ्याच्या पत्राला संस्थाचालकांकडून केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:53 IST

विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात.

- विजय मिश्रालोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : शहरात व तालुक्यात अनेक शिक्षण संस्था या इंग्लिश माध्यमाच्या असून विनाअनुदानित आहेत. त्यामुळे शालेय साहित्य खरेदीसाठी संस्थाचालकांची मनमानी सुरु केली आहे.गतवर्षी सुद्धा असाच प्रकार झाल्याची तक्रार काही पालकांनी केली होती. त्यामुळे यावर्षी गटशिक्षणाधिकारी यांनी पालकांची आर्थीक लूट होवू नये म्हणून शाळांना शालेय साहित्य विक्री, गणवेश व इतर वस्तु विक्री आपल्या संस्थेमधून करण्यात येऊ नये अन्यथा आपल्यावर कार्यवाही करण्यात येईल असे पत्र दिले होते. या पत्राकडे दुर्लक्ष करीत त्या पत्रला केराची टोपलीत टाकून या संस्था सर्रास विक्री करताना दिसत आहे.आपल्या मुलामुलींनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकावे यासाठी पालकांची अट्टाहास असतो. याच संधीचा फायदा घेत विनाअनुदानीत शिक्षण संस्थाचालक पालकांना पुस्तके, लेटरबूक, गणवेश व इतर शालेय साहित्य आपल्याच शाळेमधून घेण्याची सक्ती करतात. यासाठी बाजारभावापेक्षा जादा रक्कम ते पालकांकडून उकळतात. शेगाव शहरातील इंग्रजी शाळांमध्ये असे प्रकार सर्रास सुरु आहेत. यामुळे पालकांची आर्थीक लूट होत असल्याचे दिसून येते.अशा प्रकारे संस्थाना सदर वस्तुची विक्री करता येत नाही या बाबत शासनाचे धोरणात्मक नियम असताना जर असे निदर्शनास आल्यास संबंधित सस्थेची मान्यता रद्द करण्यात येणार असे कडक आदेश शासनाचे आहेत.असे असल्यावरही शेगाव शहरात अशा संस्था उघडपणे आपल्याच संस्थेच्या कार्यालयातून सदर सहित्याची विक्री करीत आहेत. काही पालकांनी तर या बाबतीत गट शिक्षणाधिकारी यांचेकडे लेखी तक्रार ही दिली आहे. या तक्रारीची प्रत शिक्षणाधिकारी, शिक्षणमंत्री, यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.बुलडाणा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारे साहित्याची विक्री संस्थेतून केल्या जावू नये. असे पत्र संस्थाना दिलेले आहे. परंतू हे सर्व प्रकार सर्वच संस्थेमधे सर्रास चालत असतात. मात्र कार्यवाही होताना दिसत नाही. मात्र माझ्याकडे आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने मी चौकशी करणार आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्या आदेशान्वये पुढील कारवाई नक्की करणार आहे. कुणालाही माफ केले जाणार नाही.- पी.डी. केवटगट शिक्षणाधिकारी ,शेगाव

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाShegaonशेगाव