शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकासाठी पंचायत समितीमध्येच भरली शाळा; नियुक्तीचे पत्र घेऊनच विद्यार्थी परतले

By ब्रह्मानंद जाधव | Updated: August 31, 2023 16:25 IST

गट विकास अधिकारी यू. एस. देशमुख यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन केले.

लोणार : तालुक्यातील आरडव येथील जिल्हा परिषद शाळेवर गेल्या अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने संतापलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांसोबत लोणार पंचायत समितीमध्येच ३१ ऑगस्ट रोजी शाळा भरवली. शिक्षकाच्या नियुक्तीचे पत्र मिळाल्यानंतर विद्यार्थी माघारी परतले.

गट विकास अधिकारी यू. एस. देशमुख यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी शाळा भरवून आंदोलन केले. जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक मिळत नाही, तोपर्यंत पंचायत समितीच्या आवारातून न जाण्याचा पवित्रा पालकांनी घेतला होता. दरम्यान, सहायक गटविकास अधिकारी शरद घुगे, केंद्रप्रमुख जंगल सिंग राठोड, मुंढे, कुंभारे, पंचायत समितीचे अधीक्षक रवींद्र मापारी यांनी पालकांची अडचण लक्षात घेऊन जांभूल जिल्हा परिषद शाळेवरील अतिरिक्त शिक्षक विष्णू भिवाजी तारे यांची तत्काळ नियुक्ती केली. त्यानंतरच पालक आणि विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. यावेळी विद्यार्थ्यांसोबत शैलेश सरकटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधाकर ढाकने, विनोद सरकटे व पालक उपस्थित होते.

१४० शिक्षकांकडे अतिरिक्त कामलोणार तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील १४० शिक्षकांकडे मतदार यादी निरीक्षकाचे (बीएलओ) अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळत नाही.

आरडव शाळेवर ४२ विद्यार्थी, शिक्षकां अभावी नुकसानआरडव येथील शाळेवर जळगाव जामोद तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षक पडळकर यांची ऑनलाइन बदली झाली आहे. मात्र, जळगाव जामोद येथील शाळेवर पर्यायी शिक्षक नियुक्त न झाल्याने पडळकर यांना या शाळेवरून सोडण्यात आलेले नाही. आरडव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये १ ते ४ पर्यंत वर्ग असून ४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अडीच वर्षांपासून कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

लोणार तालुक्यात शिक्षकांची १४ पदे रिक्ततालुक्यात शिक्षकांची १४ पदे रिक्त असून १३ शिक्षक अतिरिक्त आहेत. तर २१ सेवानिवृत्त शिक्षकांचे अर्ज जिल्हा स्तरावर पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत या अर्जावर कोणताही निर्णय न झाल्याने ही पदे अजूनही रिक्त आहे.

तालुक्यातील उपलब्ध असलेल्या १३ अतिरिक्त शिक्षकांपैकी एका शिक्षकाची आरडव येथील शाळेवर शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.-उमेश एस. देशमुख, गटविकास अधिकारी, पंचायत समिती लोणार.

टॅग्स :Teacherशिक्षक