शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा भरली, आईची काळजी अजूनच वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 12:14 IST

Khamgaon News : रुग्ण कमी झाले असले तरी, अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क    खामगाव : शासनाने एका महिन्यापेक्षा अधिक काळ कोरोना रुग्ण नसलेल्या गावांतून आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यातील २२८ शाळांमध्ये अध्यापन प्रत्यक्ष सुरू झाले आहे. रुग्ण कमी झाले असले तरी, अशा स्थितीत मूल शाळेत जाणार म्हणून प्रत्येकाची आई मात्र काळजीतच आहे.प्रत्यक्ष वर्ग सुरू करताना, सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून बैठकीत शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव संमत करण्याची सूचना केली होती. त्यानुसार गावातून ठराव संमत करण्यात येऊन शाळा सुरू करण्याबाबत पालकांचीही संमती घेण्यात आली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या प्रचंड वाढली. मात्र सर्वत्र सुरू असलेले लसीकरण, आरोग्य यंत्रणेकडून राबविण्यात येणाऱ्या प्रभावी उपाययोजनेमुळे रुग्णसंख्येत घट होऊ लागली आहे. विद्यार्थीही घरी राहून कंटाळले असून ऑनलाईन शिक्षणातील समस्यांमुळे मुलेही शाळेत जाण्यासाठी उत्सुक झाली आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या २८८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती समाधानकारक आहे. उर्वरीत गावांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

शाळेतून घरी येताच कपडे बदला, अंघोळही करा!  चार तास सलग वर्ग भरविण्यात येत आहेत. शाळेतून सुटल्यानंतर मुलांना घरी आल्यानंतर थेट अंघोळीला पळावे लागते. खबरदारी म्हणून गणवेष दररोज धुऊन घातला जात आहे. शाळेत येताच मुलांची ऑक्सिजन मात्रा, तापमान तपासले जात आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविला जात आहे. मास्क लावणे तर सक्तीचे असून पालक मुलांना जादा मास्क दप्तरातून देत आहेत. वर्ग सुटल्यानंतर मुले थेट घरी जात आहेत. त्यामुळे सुरक्षित शारीरिक अंतर राखले जात आहे. शिक्षकही येता-जाता मुलांवर लक्ष ठेवून आहेत.

मुलांसाठी सूचनामास्क काढू नये. हात साबणाने स्वच्छ धुवावेत किंवा सॅनिटायझरचा वापर करावा. फिजिकल डिस्टन्स पाळावे. घरी आल्यानंतर कपडे धुवायला टाकावेत आणि अंघोळ करावी.

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळा