शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

गुणपडताळणीनंतर कळणार शिष्यवृत्तीची गुणवत्ता यादी     

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 12:39 IST

गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. 

 बुलडाणा:  राज्य परीक्षा परिषदेमार्फत २४ फेबु्रवारी रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल १६ मे रोजी घोषीत करण्यात आला. या परीक्षेतील विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले असून त्यासाठी २७ मे पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. गुणपडताळणीचे आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीसाठी राज्यभर २४ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी १६ मे रोजी दुपारी तीन वाजता आॅनलाईन जाहीर झाला. विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून दिल्यानंतर या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह परिषदेकडे अर्ज करता येतो. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्ज करता येतो. यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी १६ ते २७ मे या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुदतीमध्ये आॅनलाईन प्राप्त झालेल्या अजार्नुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे. मुदतीत आॅनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी २७ मेपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सर्व प्रक्रियेनंतरच अंतिम निकाल व गुणवत्ता यादी जाहीर होणार असल्याचे निर्देश राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिले आहेत. 

 गुण पडताळणीसाठी ५० रुपये शुल्कविद्यार्थ्यांना गुुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. गुणांच्या पडताळणीची प्रक्रिया आॅनालाईन राबविण्यात येत असताना पेपरची ५० रुपये शुल्काची रक्कमही आॅनलाईन पेमेंटद्वारेच भरणे आवश्यक आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाScholarshipशिष्यवृत्तीexamपरीक्षा