चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेचे संकेतस्थळ वारंवार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:08 AM2017-11-25T01:08:35+5:302017-11-25T01:12:55+5:30

उंद्री : चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  वारंवार डोके वर काढत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त  झाले आहेत.

SBI's website is closed frequently! | चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेचे संकेतस्थळ वारंवार बंद!

चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेचे संकेतस्थळ वारंवार बंद!

Next
ठळक मुद्देउंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
उंद्री : चिखली तालुक्यातील उंद्री येथील स्टेट बँकेमध्ये लिंकिंगची समस्या  वारंवार डोके वर काढत असल्याने शेतकर्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त  झाले आहेत.
पंचक्रोशीसाठी हे गाव बाजारपेठ असल्याने येथे शेतकरी वर्गासह नागरिकांची  मोठी गर्दी असते. या ठिकाणी १0 गावातील व्यवहार स्टेट बँक शाखेशी  जोडलेले असताना त्या बँकमध्ये शेतकरी व खातेदार, निराधार या लोकांना यावे  लागत आहे. परंतु सदर बँकेची लिंकींग नेहमी बंद पडत असल्याने तासन्तास  या बँकेमध्ये सकाळपासून बँक बंद होईपर्यंत खातेदारांना शेतकर्‍यांना बसावे  लागत असल्याने ेयेथील कोलमडलेली सेवा पूर्ववत सुरळीत करण्यात यावी,  अशी मागणी खातेदार व शेतकर्‍यांकडून केली जात आहे.
 या स्टेट बँकेला १0 गावातील शेतकरी व खातेदार निराधार या लोकांच्या  सेवेसाठी ही स्टेट बँक असताना या बँकेमध्ये नेहमी लिंकींग बंद पडत  असल्याने बँक खात्यामधून पैसे जमा करणे व काढणेसाठी तासन्तास बसावे  लागते. अशा परिस्थितीत बँकेची सेवा असताना सुध्दा महत्वाचे काम अडकून  पडतात. त्यामुळे या बँकेशी जोडलेले १0 गावातील शेतकरी व खातेदार त्रस्त  झाले आहेत.

नेहमी नेटवर्कमध्ये तांत्रिक बिघाड येतो. त्यामुळे बँकेच्या कामकाजामध्ये अड थळे निर्माण होतात. या बँकेमध्ये आलेला शेतकरी व खातेदारांना सेवा उपलब्ध  करता येत नाही. याबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती देऊन अन्य नेटवर्क  जोडून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
- कमलेश मेहता
स्टेट बँक शाखाधिकारी उंद्री.

Web Title: SBI's website is closed frequently!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक