कोरोना पीडितांची भूक भागवाया जगाचा पोशिंदा सरसावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:37 AM2021-05-11T04:37:14+5:302021-05-11T04:37:14+5:30

कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात येथील गजू तारू यांनी आपल्या 'जेएमडी परिवार' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था नसलेल्या कोरोनाबाधित ...

To satisfy the hunger of Corona victims, the world's breadwinner has moved! | कोरोना पीडितांची भूक भागवाया जगाचा पोशिंदा सरसावला!

कोरोना पीडितांची भूक भागवाया जगाचा पोशिंदा सरसावला!

Next

कोरोनामुळे उद्भवलेल्या सध्याच्या संकटकाळात येथील गजू तारू यांनी आपल्या 'जेएमडी परिवार' या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था नसलेल्या कोरोनाबाधित रुग्ण व त्यांच्या संपूर्ण कुटुंबास घरपोहोच मोफत जेवण देण्याचा उपक्रम चालविला आहे. शहर व परिसरात दररोज सुमारे शंभरावर जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत. या सेवाभावी उपक्रमाची दखल घेत तालुक्यातील मेरा येथील गजानन पडघान व मोहन पडघान या प्रगतशील शेतकरी पिता-पुत्राने आपल्या शेतात उत्पादित १० क्विंटल बटाटे बाजारात न विकता गजू तारू यांच्या उपक्रमास मदत म्हणून मोफत देत हातभार लावला. याबाबत कोणत्याही प्रकाराचा बडेजावपणा न करता व गजू तारू यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट त्यांच्या दारात गाडी उभी करून पडघान यांनी आपली उदारता दाखवून दिली. या अनपेक्षित मदतीने निश्चित गरजू कोरोना रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची भूक भागणारी आहे. तथापि, कोणत्याही संकटांशी दोन हात करण्याची क्षमता असलेले शेतकरी कोरोना संकटाशी देखील दोन हात करण्यास मागे नाहीत, याचाही प्रत्यय आला आहे. संपूर्ण देश कोरोनाशी लढत असताना अनेकांच्या नशिबी उपासमार येत आहे. अशा स्थितीत जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी मदतीसाठी तत्पर असल्याचे यातून दिसून आल्याने गजानन व मोहन पडघान शेतकरी पिता-पुत्राच्या मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title: To satisfy the hunger of Corona victims, the world's breadwinner has moved!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.