शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
5
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

जळगाव जामोदच्या विध्यार्थ्यांनी बनविलेले उपग्रह अवकाशात झेपावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 19:51 IST

Satellites News जळगाव जामोद येथील १० विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दोन उपग्रहांचा समावेश आहे.

- नानासाहेब कांडलकरजळगाव जामोद : रामेश्वरम येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘स्पेस रिसर्च पेलोड व क्युब्ज चॅलेंज २०२१’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध १०० शाळांच्या प्रत्येकी १० याप्रमाणे १ हजार विद्यार्थ्यांनी १०० उपग्रह तयार केले आहेत. यामध्ये जळगाव जामोद येथील १० विद्यार्थ्यांनी बनविलेल्या दोन उपग्रहांचा समावेश आहे. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता एकाच वेळी रामेश्वरम येथून अवकाशात झेप घेणार असून, अवकाशातील विविध बाबींचा अभ्यास करणार आहेत.

जागतिक स्तरावरील या उपक्रमात तब्बल दोन उपग्रह बनविण्याचा सन्मान जळगाव जामोद येथील स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाच्या नववी व दहावीतील १० विद्यार्थ्यांच्या टीमला मिळाला आहे. यानिमित्ताने जळगाव जामोदचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झळकणार आहे. या प्रकारचा उपक्रम देशात व जगात पहिल्यांदाच राबविला जात असल्याची माहिती फाउंडेशनचे सचिव मिलिंद चौधरी यांनी दिली. याकरिता विद्यार्थ्यांचे पाचवी ते आठवी, नववी ते दहावी, डिप्लोमा व डिग्री असे तीन गट तयार करण्यात आले. प्रत्येक १० विद्यार्थ्यांच्या चमूने एक उपग्रह तयार केला आहे.या विद्यार्थ्यांनी जगातील सर्वांत कमी म्हणजे २५ ते ८० ग्रॅम वजनाचे १०० उपग्रह तयार केले. या उपग्रहांना अवकाशात ३५ ते ३८ हजार मीटर उंचीवर ‘हाय अल्टिट्यूड सायंटिफिक बलून’द्वारे प्रस्थापित केले जाणार आहे. एका किट्समध्ये हे १०० उपग्रह फिट केले असतील. या किटसोबत पॅराशूट, जी.पी.एस., ट्रॅकिंग सिस्टिम, लाइव्ह कॅमेरा जोडलेला असेल. अवकाशातील या उपग्रहांची झेप विद्यार्थ्यांना आपल्या घरीच बसून पाहता येणार आहे. हवेतील प्रदूषण ओझनच्या थराचे प्रमाण, शेती उपयोगी स्थिती यासह विविध बाबींचा अभ्यास हे १०० उपग्रह करणार आहेत.

राज्यातील तब्बल ३७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

महाराष्ट्राचा सहभाग सर्वांत मोठा१०० उपग्रह बनविणाऱ्या एक हजार विद्यार्थ्यांमध्ये तब्बल ३७५ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. यापैकी १५० विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. जिल्हा परिषद शाळांपासून विविध शाळा व कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा यात सहभाग आहे.

सातपुड्याचा शंख निनादणार विश्व स्तरावर

स्वामी विवेकानंद राष्ट्रीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष अ‍ॅड. गिरीश माळपांडे यांनी विद्यार्थी, शिक्षक व पालकांना या उपक्रमात सहभाग नोंदविण्याबाबत प्रोत्साहित केले. प्रणीत विलास हागे, देवयानी रवींद्र इंगळे, राज रामेश्वर पारस्कर, भूषण संतोष देशमाने, श्रृष्टी रवींद्र गावंडे, प्रांजल वासुदेव उगाळे, तेजस्विनी मधुकर ताठे, ओम सोनाजी हागे, वेदांत अरविंद आगरकर व आर्या दिलीप राठी या दहा विद्यार्थ्यांनी ‘बीएमपी व डीएचटी ११’ असे दोन उपग्रह बनविले. हे उपग्रह ओझोन लेअर, कार्बनडाय ऑक्साइड, हवा किती शुद्ध व प्रदूषित आहे, याची माहिती पुरविणार आहे.

टॅग्स :Jalgaon Jamodजळगाव जामोदEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी