शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच टँकरद्वारे भागवत आहेत ग्रामस्थांची तहान; अत्रंज येथे नि:शुल्क पाणी पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 13:34 IST

खामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  तालुक्यातील अंत्रज येथील सरपंचांनी गावातील पाणी टंचाईवर स्वखर्चातून तोडगा काढला आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावातील प्रत्येक कुटुंबाला २०० लिटर प्रमाणे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.खामगाव तालुक्यातील अंत्रज हे सहा हजार लोकवस्तीचे गाव आहे. या गावात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. गावातील पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी सरपंच शिवराज महाले आणि मित्र मंडळाच्यावतीने स्वखर्चातून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. १५ मार्चपासून गावातील प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लीटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत आहे. गावातील पाणी टंचाई निवारणार्थ, तसेच नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी गत दोन महिन्यांपासून प्रत्येक कुटुंबाला प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे पाण्याचे वितरण करण्यात येत असल्याचे सरपंच शिवराज महाले यांनी सांगितले.

 भारनियमनामुळे पाणी समस्या!ग्रामीण भागात वाढत्या भारनियमनामुळे नागरिकांना पाणी टंचाईस सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, अंत्रज येथेही पाण्याचे नि:शुल्क वितरण करताना ग्रामपंचायत प्रशासन आणि सरपंच शिवराज महाले मित्र मंडळाला विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

टॅग्स :khamgaonखामगावwater scarcityपाणी टंचाई