शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संतनगरी राममय!

By admin | Updated: April 16, 2016 02:03 IST

लाखो भक्तांची उपस्थिती; १३0९ भजनी दिंड्यांचा सहभाग.

गजानन कलोरे / शेगाव(जि. बुलडाणा)टाळ, मृदंगाचा गजर, गुलाल, पुष्पांची उधळण करीत सनई-चौघड्यांच्या मंगलमय ध्वनी अन् अडीच लाख भक्तांच्या मुखातून निघणारा रामनामाचा जयघोष, अशा भावविभोर वातावरणात शेगावात श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. लाखो भक्तांच्या मांदियाळीने व तेराशे नऊ भजनी दिंड्यांच्या सहभागाने या सोहळय़ाला राज्यव्यापी स्वरूप प्राप्त झाले. श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीने ८ एप्रिलपासूनच या सोहळय़ाचा प्रारंभ झाला होता. ११ एप्रिल रोजी संस्थानचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या उपस्थितीत रामायण स्वाहाकार यागाची सुरुवात झाली होती. त्या यागाची पूर्णाहूती शुक्रवारी सकाळी १0 वा. करण्यात आली. दु पारी श्रीराम जन्मोत्सवाचे कीर्तन झाल्यानंतर ठीक १२ वाजता श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरा तील श्रीरामांच्या मूर्तीसमोर रामजन्माचा पाळणा होऊन भक्तांच्या मुखातून निघणार्‍या रामनामाच्या जयघोषात रामजन्मोत्सवाचे स्वागत करण्यात आले. दुपारी २ वा. श्रींच्या पालखीची रथ, मेणा व गज अश्‍वासह नगर परिक्रमा काढण्यात आली. श्रींच्या पालखी, वारकर्‍यांना हर हर शिव मंदिर परिसरात किशोर लिप्ते व बसस्थानक परिसरात विश्‍वस्त किशोरबाबू टांक यांनी सरबत दिले. ठिकठिकाणी वारकर्‍यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था भाविकांनी उत्स्फूर्तपणे केली. श्री गजानन भक्त मंडळींनी दरवर्षीप्रमाणे महाप्रसाद व्यवस्था केली होती. श्री गजानन भक्त मंडळ नागपूर, अकोट, शेगाव यांनी दोन दिवस अग्रसेन भवन येथे वारकर्‍यांना महाप्रसाद व्यवस्था केली होती. नागपूर टिमकीच्या भक्तांनी वारकर्‍यांचे जोडे, चपला ठेवण्याची विनामूल्य व्यवस्था केली. शनिवार, १६ एप्रिलला सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी, गोपाल काला होऊन यात्रेची सांगता होईल.