शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

संग्रामपूर : मतदारांनी दिली नवख्या उमेदवारांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 01:07 IST

संग्रामपूर: तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवडणुकीची मतमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे  निकाल हाती आले. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल  उधळून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये मतदारांनी नव्या चेहर्‍यांना संधी दिली असल्याचे  चित्र निकालाअंती स्पष्ट झाले.

ठळक मुद्देगुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष नव्या चेहर्‍यांना संधी

अमोल ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर: तालुक्यातील १८ ग्रामपंचायतीची निवडणुकीची म तमोजणी झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे  निकाल हाती आले. विजयानंतर अनेक कार्यकर्त्यांनी गुलाल  उधळून व फटाके फोडून जल्लोष साजरा केला. बहुतांश ग्राम पंचायतींमध्ये मतदारांनी नव्या चेहर्‍यांना संधी दिली असल्याचे  चित्र निकालाअंती स्पष्ट झाले.तालुक्यातील क्रमांक दोनची व मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख  असलेल्या पातुर्डा बु. ग्रामपंचायतीच्या निवडणुकी जिल्हा  परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्या मोठय़ा वहिनी  शैलजा प्रकाश भोंगळ या २६ मतांनी विजयी झाल्या. तर  काकोडा ग्रामपंचायतीमध्ये विद्यमान सरपंच शत्रुघ्न मानखैर  यांच्या अर्धांगिनी पर्वणी शत्रुघ्न मानखैर विजयी झाल्या. त्यांना  एकूण २४६ मते मिळाली. तर सांसद आदर्श ग्राम करमोडा ग्राम पंचायतीमध्ये विद्यमान सरपंच स्नेहा राजेश वर्गे यांना मतदारांनी  परत निवडून दिले. भोन ग्रामपंचायतीमध्ये कृउबासचे सभापती  श्रीकृष्ण तराळे यांच्या अर्धांगिनी वेणू श्रीकृष्ण तराळे विजयी  झाल्या त्यांना एकूण ४६२ मते मिळाली. धामणगाव ग्रामपंचाय तीमध्ये विद्यमान सरपंच राजकन्या अजाबराव गोतमारे यांचे पती  अजाबराव नामदेव गोतमारे विजयी झाले त्यांना ५५४ मते  मिळाली. सावळी ग्रामपंचायतीमध्ये शुभांगी प्रकाश अरबट या  सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांना २३६  मते मिळाली. पेसोडा  ग्रामपंचायतीमध्ये ज्योती अनंता भिसे या विजयी झाल्या. त्यांना  ५५९ मते मिळाली. जस्तगाव ग्रामपंचायतमध्ये तुळशीराम पांडुरंग  वानखडे  विजयी झाले. त्यांना २८७ मते मिळाली. टाकळी पंच  ग्रामपंचायतमध्ये पुष्पा पंजाबराव वानखडे या विजयी झाल्या.  त्यांना ३८६ मते मिळाली. काटेल ग्रामपंचायतमध्ये शत्रुघ्न  वामनराव डामरे विजयी झाले. त्यांना २६0 मते मिळाली.  एकलारा ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदी रमेश पांडुरंग पवार विजयी  झाले त्यांना ९८७ एवढी सर्वात जास्त मते मिळाली. १८ सरपंचा पैकी त्यांनी सर्वात जास्त मते मिळवली आहेत. तर कोलद ग्राम पंचायतीमध्ये अर्चना सुभाष तायडे हय़ा सरपंचपपदी विजयी  झाले. त्यांना ३३५ मते मिळाली. वडगाव वाण ग्रामपंचायतीमध्ये  रूपाली प्रशांत राऊत या सरपंचपदी विजयी झाल्या त्यांना ५00  मते मिळाली. पिंप्री काथरगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची  निवडणूक अटीतटीची झाली. त्यामध्ये छाया रवींद्र धामोळे यांचा  १ मताने विजय झाला. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गणेश टापरे यांचा १  मताने पराभव झाला. चोंढी ग्रामपंचायतीमध्ये मनकर्णा सदाशिव  गव्हांदे हय़ा सरपंचपदी विजयी झाल्या. त्यांना ४२३ मते  मिळाली. मनार्डी ग्रा.पं.मध्ये सविता बळीराम दांडगे सरपंचपदी  विजयी झाल्या. -